Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

विरोधकांकडून आरक्षण संपविण्याचा प्रयत्न!

पालकमंत्री छगन भुजबळ यांचा वटार (ता. बागलाण) येथे संवाद मेळाव्यात आरोप.

सटाणा : विरोधी पक्षातील काही नेते (Opposition leaders) आरक्षण (OBC reservation) संपविण्याचा प्रयत्न करत आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांना तिलांजली देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा घणाघात जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला.

Chhagan Bhujbal
संजय राऊत मंगळवारी मोठा बॉम्बस्फोट करणार!

वटार (ता. बागलाण) येथील सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन मंत्री भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुनील मोरे होते.

Chhagan Bhujbal
मायणीच्या देशमुखांवर ईडीची कारवाई; १८ तारखेपर्यंत कोठडी

भुजबळ म्हणाले, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा पहिला मेळावा शरद पवार यांच्या उपस्थितीत जालन्याला झाला. त्यानंतर पवार साहेबांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. गेल्या २७ वर्षांपूर्वी मिळालेले हे आरक्षण संपविण्याचा कट काहींचा आहे. या आरक्षणामुळे अनेक विद्यार्थी घडले. उच्चपदावर गेले. शिक्षणात जसे पुढे गेले पाहिजे तसेच राजकीय क्षेत्रात देखील ओबीसी पुढे गेले पाहिजे, यासाठी आरक्षण दिले. मात्र, आज आरक्षणावर गदा आणली.

ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी मी कुणाचेही पाय धरायला तयार आहे. पक्षभेद विसरून सर्वांकडे जाण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. अपघातात निधन झालेल्या समता सैनिकांना त्यांनी या वेळी श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, डॉ. सतीश लुंकड, माजी आमदार संजय चव्हाण, ॲड. रवींद्र पगार, माजी नगराध्यक्ष सुनील मोरे, डॉ. सतीश लुंकड, इंजि. जिभाऊ गांगुर्डे, मच्छिद्रनाथ शेवाळे, सचिन सावंत, दगडू महाजन, दौलत गांगुर्डे, विलास शिंदे, जितेंद्र बच्छाव, लक्ष्मीबाई मोरे, मुरलीधर खैरनार, वैभव गांगुर्डे आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com