एकीकडे भाजपचे आंदोलन; दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पुढाकाराने भरले ५१ लाखांचे वीज बील!

चांदोरी (निफाड) येथे महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत शेतकरी संवाद मेळावा.
एकीकडे भाजपचे आंदोलन; दुसरीकडे राष्ट्रवादीच्या
पुढाकाराने भरले ५१ लाखांचे वीज बील!
Farmers paying electricity billsSarkarnama

नाशिक रोड : महाकृषी अभियान योजनेत जास्तीत- जास्त शेतकऱ्यांनी भाग घेऊन थकबाकीमुक्त झाले पाहिजे. अखंडित व गतिमान सेवेसाठी ही योजना असून, इतर शेतकरी बंधूंना सुद्धा याची माहिती व फायदे सांगून त्यांनाही सहभागी करून घ्या, असे आवाहन महावितरण नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले. महावितरणच्या ओझर उपविभागाकडून चांदोरी येथील चितेगाव फाटा येथे आयोजित महाकृषी अभियानांतर्गत शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

Farmers paying electricity bills
कायदे मागे घेतले, पण शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या धोरणाचे काय?

सध्या वीज बिलांची थकबाकी वसुलीची मोहीम सुरु आहे. त्याच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून अतिशयआक्रमक आंदोलन केले जात आहे. निफाड येथे देखील आंदोलन झाले. मात्र दुसऱ्या बाजुला या विषयावर राजकारण न करता शेतकऱ्यांच्या वीजेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचे सकारात्मक राजकारण जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर व सिद्धार्थ वनारसे आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिगंबर गीते हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला.

Farmers paying electricity bills
बिनविरोध नकोच, मते मिळवून जिंकण्यातील आनंद बिनविरोध निवडणुकीत नाही!

नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, नाशिक ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर व सिद्धार्थ वनारसे आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिगंबर गीते व्यासपीठावर उपस्थित होते. मेळाव्यात २७९ शेतकऱ्यांनी वीज बिलापोटी ५१ लाख रुपयांचा भरणा केला. या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सूचना, तक्रारी व अपेक्षा या वेळी मनोगतातून व्यक्त केल्या. मेळाव्याचे प्रास्ताविक व संचालन सहाय्यक अभियंता विशाल मोरे यांनी केले. आभार लिपिक दिनेश जोशी यांनी मानले. या वेळी उपकार्यकारी अभियंता किरण जाधव, ओझर उपविभागातील अभियंते, जनमित्र, विविध गावचे सरपंच व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

ओझर उपविभागाची कृषी वीजबिल थकबाकी रुपये १६० कोटी असून, कृषी धोरणांतर्गत सुधारित थकबाकी ६६. ४७ कोटी रुपये आहे. नोव्हेंबरपर्यंत एकूण ९ कोटी ४९ लाखांचा वीज बिलाचा भरणा शेतकऱ्यांनी केला आहे. या मेळाव्यात सुद्धा शेतकऱ्यांनी प्रतिसाद देऊन एकूण २७९ शेतकऱ्यांनी एकूण ५१ लाख १३ हजार भरणा केला. तसेच, घरगुती व इतर वर्गवारीतील ग्राहकांनी एकूण ३ लाख रुपयांचा भरणा केला. सर्वाधिक कृषी वीजबिल भरणा केलेल्या ग्राहकांमध्ये एकनाथ पांडुरंग फड ५ लाख ३० हजार, शशिकांत गोविंद फड २ लाख १२ हजार, सोमनाथ बांगर २ लाख ५ हजार, अनिल घुमरे १ लाख ४८ हजार आणि निवृत्ती शंकर सानप यांनी १ लाख रुपयांचा भरणा केला. या वेळी वीज देयक भरणा केलेल्या शेतकऱ्यांचाही सन्मान करण्यात आला.

अनेकदा सहकारी संस्थांची कर्जे थकतात. त्यानंतर दिर्घ काळ थकलेली कर्जे शासन माफ करते. त्यामुळे दिर्घकाळ थकलेली वीज बिले देखील माफ होतील, असा एक मतप्रवाह दिसतो. त्यावर प्रबोधनाची गरज आहे. शेतकऱ्यांना मोफत काहीच नको, मात्र त्यांना वेळेवर व पुरेशी वीज, शेतीची मदत आदी मिळायला हवी. हे त्यांचे मुळ प्रश्न आहेत.

- सिद्धार्थ वनारसे, राष्ट्रवादी काँग्रेस.

...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in