Malegaon News; पालकमंत्री दादा भुसे यांची बदनामी हेच विरोधकांचे एकमेव काम!

मालेगावचे उपमहापौर नीलेश आहेर यांनी विरोधकांनी दादा भुसे यांच्या विरोधात बदनामी केल्याचा आरोप केला.
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama

मालेगाव : शहर (Malegaon) व तालुक्यातील विविध विकासकामांमुळे परिसराची विकासाकडे वाटचाल सुरु आहे. यामुळेच विरोधकांना (Opposition) पोटशूळ उठला आहे. विकासकामांना, (Devolopment) सामाजिक उपक्रमांना खीळ घालण्याचा प्रयत्न होत आहे. पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचा संबंध नसताना प्रत्येक प्रकरणात त्यांचा संबंध जोडला जात आहे. यातून त्यांची बदनामी करणे हे एकमेव काम विरोधकांनी सुरु केले आहे. (Nilesh Aher claim, Opposition wants to defame Guardian Minister Dada Bhuse)

Dada Bhuse
Chhagan Bhujbal: `असा` निर्णय घ्यायचा होता तर प्रतिज्ञापत्र कशासाठी मागवली?

सामान्य जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नसल्याचे बोरी-आंबेदरी थेट जलवाहिनी प्रकरणातून सिद्ध झाले असल्याचे मत माजी उपमहापौर नीलेश आहेर, महानगरप्रमुख विनोद वाघ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Dada Bhuse
Dada Bhuse News: ...तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विरोध करणार!

शासकीय विश्रामगृहावर बाळासाहेबांची शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, भाजप, मराठा महासंघ आदींसह विविध पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आदींच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. यात पदाधिकाऱ्यांनी महापुरुषांच्या नावावर राजकारण करु नये. महापुरुष कोणाचीही मक्तेदारी नाही असे मत व्यक्त केले.

श्री. आहेर म्हणाले, शिवतिर्थावर सुशोभीकरणासाठी आमचा अर्ज प्रथम गेल्याने आम्हाला परवानगी मिळाली. एकता मंडळाने गेल्या वर्षी आधी परवानगी मागितली. आम्ही विरोध न करता यात सहभागी झालो होतो. शिवतिर्थ ही मक्तेदारी व पेटंट नाही.

पालकमंत्री दादा भुसे यांनी शहराच्या वैभवात भर घालणारा जॉगिंग ट्रॅक, धार्मिक शिवमहापुराण कथा आदी कार्यक्रम यशस्वी केले. या सर्व कार्यक्रमांना विरोधकांनी विरोध करीत आडकाठी आणली. कॅम्प भागातील मनोज जगताप यांची भांडणे मिटली असताना पुन्हा कुरापत काढून भांडण करण्यात आले.

कौळाणे येथील तरुणाने सामान्य नागरिक व व्यापाऱ्यांना स्कीममध्ये पैसे जमा करण्याचे आमीष दाखवून अनेकांची लाखोंची फसवणूक केली. अशा भामट्याची विरोधक पाठराखण करीत आहेत हे काय दर्शविते. शिवतिर्थ सुशोभीकरणासाठी ३० लाख रुपये निधी मंजूर आहे. निविदा प्रसिद्ध होऊनही कोणीही निविदा न भरल्याने काम प्रलंबित आहे. फेरनिविदा काढण्यात आली आहे.

विरोधक त्याचे निमित्त करून शिवतिर्थावर आंदोलन करीत आहेत. आगामी काळात असले प्रकार व पालकमंत्र्यांची बदनामी खपवून घेतली जणार नाही. बाळासाहेबांची शिवसेना संबंधितांना जशास तशे शिवसेना स्टाईलने व प्रसंगी कायदेशीर कारवाई करून उत्तर देईल असे जिल्हाप्रमुख संजय दुसाने यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in