Jalgaon News : फडणवीस- महाजनांनी नेमलेल्या विद्या गायकवाडांना भाजपच्याच नगरसेवकांचा विरोध

Maharashtra Politics : अविश्‍वास ठरावासाठी नगरसेवकांना मतदान करण्यासाठी अधिकृत व्हीप बजवावा लागणार आहे.
Jalgaon News
Jalgaon News Sarkarnama

Jalgaon News : जळगाव शहरातील समस्यांकडे महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड लक्ष देत नसल्याच्या कारणावरून आयुक्तांची बदली करण्यात यावी, यासाठी भाजपच्याच नगरसेवकांनी साखळी उपोषण केले, इतकचं नव्हे तर, पक्षातर्फे आयुक्त गायकवाड यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबाही दिला. पण यामुळे आता भाजपचीच खरी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

आयुक्तांविरोधात केलेल्या उपोषण आणि अविश्वास प्रस्तावासंदर्भात संपूर्ण भाजप डॉ.अश्‍विन सोनवणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. भाजपच्या बहुतांश नगरसेवकांनी त्याला पाठिंबा दिला तर महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना ठाकरे गट, शिंदे गट व एमआयएम पक्षानेही पाठिंबा देत अविश्वास ठरावावर तब्बल ५६ नगरसेवकांनी सह्या केल्या आहेत. महापालिकेत एकूण ७५ नगरसेवक आहेत. त्या पैकी तीन नगरसेवक अपात्र आहेत. त्यामुळे ७२ नगरसेवक मतदान करणार आहेत.

Jalgaon News
Prithviraj Chavan News: महात्मा गांधींच्या हत्येनंतर 'आरएसएस'वर बंदी का आणली?पृथ्वीराज चव्हाणांनी इतिहासच काढला

अविश्‍वास ठरावासाठी नगरसेवकांना मतदान करण्यासाठी अधिकृत व्हीप बजवावा लागणार आहे. मात्र या ठिकाणीही भाजपची अडचण झाली आहे. महापौर निवडणुकीत भाजपचे २७ नगरसेवक फुटले त्यावेळी गटनेते पदाचा वाद निर्माण झाला होता. फुटीर गटातर्फे ॲड.दिलीप पोकळे हे आमचे गटनेते असल्याचा दावा करण्यात आला. तर तत्कालीन गटनेते भगत बालाणी यांनीदेखील आपणच गटनेते असल्याचा दावा केला होता. हा वाद न्यायालयात असून तो अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे भाजपचा महापालिकेत अधिकृत गटनेताच नाही. त्यामुळे त्यांना व्हीप काढण्याबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजेज न्यायलयात गटनेता म्हणून दावा केलेले भगत बालाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांच्या जागी राजेंद्र घुगे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. मात्र न्यायालयात वाद प्रलंबित असल्याने नवीन गटनेते अधिकृत ठरलेले नाहीत. त्यामुळे भाजपच्याच नगरसेवकांना व्हीप बजावण्यबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे. महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे व गटनेते राजेंद्र घुगे पाटील यांच्यातर्फे संयुक्त व्हीप नगरसेवकांना बजावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र तो कितपत लागू होईल?या प्रश्‍नच आहे.

दुसरीकडे भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षाने आणलेल्या अविश्‍वास ठरावाबाबत खुलेपणाने आपले मत व्यक्त केलेले नाही. भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे नगरसेविका आहेत. त्यांनी या अविश्‍वास प्रस्तावार स्वाक्षरी केली आहे. मात्र आमदार भोळे यांनीही खुलेपणाने मत व्यक्त केलेले नाही.त्यामुळे भाजप नगरसेवकांमध्येच काही अंशी संभ्रम असल्याचे दिसून आले आहे.

Jalgaon News
BJP Assembly Elections 2024: भाजप तपासणार मतदारांचा 'डीएनए' ; कोअर कमिटीच्या बैठका सुरू..

भाजपचे सहकारी पक्ष शिवसेना शिंदे गटाचे नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही याबाबतीत कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. तर शिवसेना शिंदे गट महापालिकेत अधिकृत नाही त्यामुळे त्यांच्या गटाच्या नगरसेवकांनाही व्हीप बजाविता येणार नाही. एमआयएमच्या तीन सदस्यांनी अविश्‍वास प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. मात्र सभागृहात भाजपसोबत राहणार काय याबाबत प्रश्‍नच आहे. त्यामुळे अविश्‍वास ठराव बहुमताने कसा मंजुर होणार याकडेच शहरवासियांचे लक्ष आहे.

आयुक्तावर भाजपने आणलेल्या अविश्‍वास ठरावावर मंगळवारी मतदान होणार आहे. या ठरावाच्या विरोधात सामाजिक संघटनाही उतरल्या आहे. लोकसंघर्ष मोर्चाने आयुक्तांना पाठिंबा व्यक्त केला असून मतदानच्या सभेच्या वेळी आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेत नगरसेवक नाहीत, परंतु त्यांनीही आता भाजपवर टीका सुरू केली आहे. त्यामुळे बहुमताने प्रस्तावावर स्वाक्षऱ्या असतांनाही हा ठराव बहुमताने मंजूर होणार काय? याबाबत मात्र प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

Jalgaon News
Bachchu Kadu On Sambhaji Bhide: एकनाथ शिंदेंनी घडाघडा बोलावं ; संभाजी भिडेंच्या वादात बच्चूभाऊंनी मुख्यमंत्र्यांना ओढलं

या सर्व वादात अविश्‍वास ठरावाच्या बाबत भारतीय जनता पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अविश्‍वास ठराव मंजूर झाल्यास भाजपची शान राखली जाईल मात्र तो नामंजूर झाल्यास भाजपची नामुष्की तर होईलच परंतु पक्षात दोन गट पडल्याचे जनतेसमोर उघड होईल ऐन निवडणूकीच्या काळात नेत्यांना व कार्यकर्त्यांनाही ते अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे जळगाव शहरातीलच नव्हे तर आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com