Sharad Pawar: आमचं संघटन खिळखिळं झालं की काय, ते निवडणुकीत दिसेल!

शरद पवार म्हणाले, विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनाबाबत फार चिंता करू नये.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

नाशिक : आमचं (NCP) संघटन खिळखिळं झाले की काय हे याबाबत इतरांनी फार चिंता करू नये. जेव्हा निवडणूक होईल, तेव्हा जनताच त्याबाबत कौल देईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. (We are prepared to face Election any time)

Sharad Pawar
Sharad Pawar: सरकार केव्हा पडेल हे सांगायला मी ज्योतिषी नाही!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसांच्या नाशिक व धुळे दौऱ्यावर आहेत. आज त्यांचे नाशिकला ओझर विमानतळावर आगमन झाले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे स्वागत केले. हॅाटेल एमराल्ड पार्क याथे पक्षाच्या विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी त्यांचे स्वागत करून चर्चा केली.

Sharad Pawar
Nashik News: मतांचा विक्रम करणाऱ्या अमृता पवारांना यंदा संधी हुकली!

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य शासनाने नुकतेच राज्यातील विविध विकासाची कामे व प्रकल्पांना स्थगिती देण्याचा धडाका लावला आहे. याबाबत ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने जे प्रकल्प मंजूर केले आहेत. ज्या प्रकल्पांत्या निविदा काढण्यात आल्या आहेत, त्यांना विलंब करणे किंवा रद्द करणे योग्य नाही. त्यामुळे वेगळा संदेश जातो.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी करणार काय, याबाबत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करायची की नाही हे नंतर बघू. आगोदर इतर मागासवर्गबाबत निर्णय होऊ द्या. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत दिलेला निर्णय चिंताजनक आहे. त्यामुळे यामुळे समाजाचा एक मोठा वर्ग नाराज होईल. हा वर्ग सत्तेबाहेर जातो की काय अशी भीती यामुळे निर्माण झाली आहे.

ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीच्या घटक पक्षानी एकत्र निवडणूक लढवावी अशी सध्या तरी आमची भूमिका आहे. योग्य वेळी सहमतीने व चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com