कृषी कायदे रद्द केल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

शेतकऱ्यांसाठी जे काही केले ते मोदींनी केले.
कृषी कायदे रद्द केल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Devendra Fadnavis sarkarnama

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शुक्रवारी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यावरुन आता केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका करणाऱ्यांना जोरदार उत्तर दिले. (Opposition leader Devendra Fadnavis criticizes the state government)

 Devendra Fadnavis
भाजपचे सरकार येणार? : फडणवीस यांनी वेगळ्या शब्दांत सांगितले..

फडणवीस नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, टीका करणारे टीका करत असतात. काम करणारे काम करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी कायद्यांचा निर्णय घेतला होता. मात्र, काही लोकांनी त्याला कायम विरोध केला. म्हणून पंतप्रधानांनी काल स्पष्टपने सांगितले की आम्ही काही लोकांची समजूत काढू शकलो नाही. त्यामुळे आम्ही हा कायदा परत घेतो आहे. लोकशाहीमध्ये असा निर्णय घेण्याचा मोठे पणा फार थोडे लोक दाखवत असतात. तसा तो नरेंद्र मोदी यांनी दाखवला आहे. या निर्णयासंदर्भात जे टीका करत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही, असा आरोपही फडणवीस यांनी केला.

शेतकऱ्यांसाठी जे काही केले ते मोदींनी केले. किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. एकट्या महाराष्ट्रात ९ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. शेतीसाठी युपीए सरकारच्या काळात अर्थसंकल्पात ३५ हजार कोटींची तरतूद केली जात होती. ती मोदी सरकारच्या काळामध्ये १ लाख ३५ हजार कोटी रुपये झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या निर्णयामध्ये राजकारण आहे, असे म्हणणाऱ्या टिकाकारांना जनताच उत्तर देईल, असेही फडणवीस म्हणाले.

 Devendra Fadnavis
`भाजपमध्ये कसे वागायचे, हे बावनकुळेंकडून इच्छुकांनी शिकून घ्यायला हवे!`

दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या एसटी संपावरही फडणवीस यांनी भाष्य केले. ते म्हणाले, या सरकारची भूमिका ही दुटप्पी आहे. देशभरात कुठेही घटना घडली तर ते प्रतिक्रिया देतात. मात्र, आपल्या राज्यातील प्रश्नाकडे त्यांचे लक्ष्य नाही. राज्य सरकारची भूमिका ही जीवघेणी अशा प्रकारची आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. विलीनीकर आणि इतर मागण्या आहेत त्याच्यांवर काय मार्ग निघू शकतो असे मी सरकारला सांगितले आहे. सरकारला निर्णय घ्याचा आहे, त्यामुळे मी अधिक बोलणे योग्य ठरणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.

Related Stories

No stories found.