सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे का केले नाही!

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी अधिकाऱ्यांशी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चर्चा केली.
A,mbadas Danve
A,mbadas Danve Sarkarnama

जळगाव : जिल्ह्यात (Jalgaon) अतिवृष्टग्रस्त (Heavy Rainfall) शेतकरी (Farmers) सहा लाख ९१ हजार आहेत. मात्र, केवळ ७७ हजार शेतकऱ्यांनाच नुकसानभरपाई (Compensation) मिळाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे काय, असा प्रश्‍न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते (Leader Of opposition) अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना केला. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्ह्यातील प्रश्‍नाबाबत आढावा बैठक घेतली. (Shivsena Leader Ambada Danve take meeting with Jalgaon collector)

A,mbadas Danve
अंधेरी रातोमे एक मसीहा निकलता है...वाळू माफीया धास्तावले!

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शुक्रवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, गजानन मालपुरे आदी उपस्थित होते.

A,mbadas Danve
राहुल गांधींच्या यात्रेबाबत मोठी बातमी, राज्यातील १६ किमीचा टप्पा चार चाकीतून पार करणार; कारण...

श्री. दानवे यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा आढावा घेतला. जिल्ह्यात यंदा सहा लाख ९१ हजार शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. त्यापैकी ७७ हजार शेतकऱ्यांना १८ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. श्री. दानवे यांनी नाराजी दर्शवित उर्वरित शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचे काय, असा प्रश्‍न केला. त्यावर अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. त्यांनी लम्पी रोगामुळे जनावरे दगावल्याबाबतही माहिती घेतली.

दिवाळी शिधा साखर कमी आली

‘आनंदाचा दिवाळी शिधा’ या शासनच्या १०० रुपयांत शिधावाटप योजनेत डाळ, तेल, साखर व रवा, अशा चार वस्तू होत्या. मात्र, काही ठिकाणी तीन, तर काही ठिकाणी दोनच वस्तू देण्यात आल्याची माहिती जिल्हा शिवसेनाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिली. त्यावर पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले, की साखर कमी आल्यामुळे त्याची वाटप होऊ शकले नाही. इतर तीन जिन्नस योग्यप्रकारे उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेचा २५ कोटीचा निधी देणार

महापालिकेच्या निधीबाबतही चर्चा झाली. महापालिकेचे गटनेते नितीन लढ्ढा यांनी महापालिकेचा विविध निधी प्रलंबित असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी मित्तल यांनी सांगितले, की याबाबत आपणही माहिती घेतली आहे. महापालिकेचा २५ कोटी रुपयांचा निधी लवकरच देण्यात येईल. त्यानंतर उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी अमृत योजना २.० च्या प्रस्तावाचा अहवाल तयार करण्याच्या मक्त्याबाबत प्रश्‍न केला. त्याला विलंब होत असल्याने महापालिकेला या योजनेच्य पहिल्या फेसपासून मुकावे लागणार आहे. त्यामुळे मोठे नुकसान होईल. त्यामुळे त्याबाबत विचार करण्याची त्यांनी मागणी केली.

मुख्यमंत्री आल्यावर आम्हीही परवानगी मागू

शिवसेनेचे गजानन मालपुरे यांनी मुक्ताईनगर येथील श्रीमती सुषमा अंधारे यांच्या सभेला परवानगी नाकारल्याचा प्रश्‍न उपस्थित केला. आम्ही अगोदर परवानगी मागितली होती. शिंदे गटाने नंतर महाआरतीची परवानगी मागितली. त्यांच्यामुळे तुम्ही आमचीही परवानगी रद्द केली, हे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांचा दौरा आल्यानंतर आम्हीही त्याच ठिकाण कार्यक्रमाची परवानगी मागायची काय, असा सवालही त्यांनी केला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सध्याच्या स्थितीची माहिती दिली व प्रत्येकवेळी परिस्थिती वेगळी असते. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही दोघांनाही परवानगी नाकारली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com