‘सत्ता गेल्याने विरोधक पिसाळलेले भ्रमिष्ठ’

सदाभाऊ खोत म्हणतात: रयत क्रांतीतर्फे राज्यात शेतकरी प्रबोधन यात्रा
Sadabhau Khot
Sadabhau KhotSarkarnama

नाशिक : कायद्याच्या राज्यात विरोधकांनी (Opposition parties) शेतकरी प्रश्नावर (Farmers Issues) बोलण्याऐवजी खंजीरची भाषा सुरू केली आहे. सत्ता गेल्याने पिसाळलेल्या कुत्र्यासारखी (Crused dog) विरोधकांची स्थिती झाल्याचा आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केला. नाशिकमध्ये (Nashik) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील विरोधी पक्षावर ‘सत्ता गेल्याने पिसाळलेले भ्रमिष्ठ’ झाले असल्याची टीका केली. (Sadabhau Khot criticised Opposition party leaders)

Sadabhau Khot
Bharat Jodo Yatra : तळपती मशाल हातात घेत राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल

श्री. खोत यांनी राज्यात शेतकऱ्यांच्या शेतकरी प्रश्नांबाबत प्रबोधनासाठी आजपासून राज्यात रयत क्रांतीतर्फे शेतकरी प्रबोधन यात्रा काढली जाणार असल्याची माहिती दिली. राज्यातील शिंदे सरकारचे तीन महिन्यांतील कामकाज चांगले आहे. ते घटक पक्षांना न्याय देतील, अशी आशा व्यक्त केली.

Sadabhau Khot
सावरकरांच्या जन्मभूमीत राष्ट्रवादीने अब्दुल सत्तार यांची खोक्यांसह तिरडी काढली!

याप्रसंगी डॉ. हेमंत सिंग, दीपक पगार, दीपक पगार, शिवनाथ जाधव आदी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात येत्या १६ नोव्हेंबरपर्यंत ही प्रबोधन यात्रा चालेल. त्यात खानदेश व विदर्भातील जिल्ह्यात दौरा करून पक्षवाढीसह शेतकरी प्रबोधन केले जाणार आहे. दौऱ्यात प्रत्येक जिल्‍ह्याची पीक स्थिती, खरीप रब्बीच्या अडचणींबाबत शेतकऱ्यांशी, तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात येईल.

त्यानंतर राज्यातील शेतकरी प्रश्नांबाबत राज्य आणि केंद्राकडे मागण्या मांडण्यात येतील. राज्यातील शिंदे सरकारच्या तीन महिन्यांच्या कामगिरीत शेतकरी प्रश्नांबाबत मात्र शासन स्तरावरील कामाबाबत नाराजी असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी एफपीआर दिलेले नाहीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करीत सरकारने संचालक मंडळ बरखास्त करावीत, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

भारत जोडो यात्रेची खिल्ली

श्री. खोत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची खिल्ली उडवीत काँग्रेसने पन्नास वर्षांत शेतकऱ्यांचे जे हाल केले त्याबद्दल पापक्षालन यात्रा काढायला हवी होती. राज्य अन्न आयोगाने २१ ऑक्टोबरला वीज कंपनीने थकबाकी वसुलीसाठी इतर अनेक उपाय करावेत; पण त्यासाठी शेतातील पिकाला पाणीपुरवठा करणाऱ्या विजेचे कनेक्शन तोडू नये, असा आदेश दिला आहे. त्याचे स्वागत करीत राज्यभर थकबाकी वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडू नये, अशी मागणी केली.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in