नुपूर शर्मा किंवा भाजपा म्हणजे भारत नाही!

नागपूर येथे छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापदिन साजरा झाला.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : भाजपाच्या (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी मोहंमद प्रेषितांविषयी चुकीचे विधान केले. त्याचा परिणाम सबंध देशावर होतोय. अनेक अखाती देश आपल्या देशाचे उत्पादन घेण्यास तयार नाहीत. पण मला त्यांना सांगायचे आहे. एकटी नुपूर शर्मा किंवा भाजपा म्हणजे भारत नाही, हा भारत हिंदू-मुस्लिम सर्वांचा आहे सर्व धर्मीयांचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. (Chhagan Bhujbal criticised BJP on spoakesperson`s Statement)

Chhagan Bhujbal
काँग्रेसला लागली चिंता; उमेदवाराला मिळालेली अतिरिक्त मते नेमकी कोणाची!

नागपुर येथे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आज देशात बेरोजगारी आणि महागाईसारखे महत्वाचे प्रश्न जनतेसमोर असताना हनुमान चालीसा, लाऊस्पिकर, मंदिर - मस्जिद असे मुद्दे उभे करून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.

Chhagan Bhujbal
राज्यात राज्यसभेच्या एका जागेसाठी आटापिटा करणाऱ्या भाजपला देशात मोठा फटका!

केंद्र सरकार अध्या विरोधी पक्षातील नेत्यांची मुस्कटदाबी करत आहे. मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांवर दबाव निर्माण करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. त्यामुळेच आज नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर अन्याय झाला असा थेट आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केला.

ते पुढे म्हणाले, शरद पवार यांचे लोकाभिमुख नेतृत्व देशाला मान्य, त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहचवले पाहिजे त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेपर्यंत पोहचले पाहिजे, त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे.

ते म्हणाले की, १९९९ ला पक्षाची स्थापना झाल्यानंतर पार्टीचा पहिला प्रदेशाध्यक्ष म्हणुन मला जबाबदारी मिळाली होती पक्ष संघटना मजबुत करण्याचे मोठे काम आम्ही महाराष्ट्रभर फिरुन कार्यकर्त्यांच्या जोरावर केले. अनेक अडचणींचा सामना करावा लागला असला तरी महाराष्ट्रात नेहमीच पक्ष पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर राहिला आहे अशी आठवण सांगतानाच. देशात सर्व प्रश्नाची जाणं असणारे आणि प्रत्येक प्रश्नांना वाचा फोडणारे नेते म्हणजे शरद पवार आहेत. त्यामुळे विचारांची पक्की बैठक असणारे नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वच जण काम करत आहोत.

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह माजी मंत्री रमेश बंग,शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे,शब्बीर विद्रोही, अनिस देशमुख, बापू भुजबळ, प्रा दिवाकर गमे, राज राजापूरकर,प्रवीण कुंटे पाटील आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in