Narendra Modi News; `या` शेतकऱ्याने नरेंद्र मोदींना लिहिले रक्ताने पत्र!

नगरसूलच्या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठविली निमंत्रणपत्रिका, होळीच्या दिवशी कार्यक्रम
Narendra Modi & Farmers letter
Narendra Modi & Farmers letterSarkarnama

नगरसूल : (yeola) कांद्याच्या दरातील घसरणीने शेतकरी (Farmers) कमालीचा खचला आहे. उत्पादनखर्चही निघत नसल्याने हताश झालेल्या येथील एका शेतकऱ्याने थेट कांद्याला अग्निडागचा कार्यक्रम घोषित करून संताप व्यक्त केला आहे. या कार्यक्रमाची पत्रिकाही त्याने छापली असून, स्वतःच्या रक्ताने थेट (Centre Givernment) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पत्र लिहिले आहे. (Onion farmer write a letter with blood to Prime Minister Narendra Modi)

Narendra Modi & Farmers letter
Dhule News; शेतकऱ्यांनी केली खासदार डॉ. सुभाष भामरेंची कोंडी?

शेतीमालाला रास्त भाव मिळालाच पाहिजे, असे सर्व राजकारणी निवडणुकीवेळी बेंबीच्या देठापासून ओरडत असतात. मात्र नंतर शेतकऱ्याचा साऱ्यांनाच विसर पडतो.

Narendra Modi & Farmers letter
NCP News : राष्ट्रवादीचा बडा नेता घेणार अमित शहांची भेट

कांद्याला जीवनावश्‍यक वस्तूत समावेश करावा, ही मागणीही तशीच अधांतरी राहिलेली. त्यामुळे कांद्याचे पीक म्हणजे एक जुगार ठरला आहे. निवडकवेळी थोडेच दिवस बरे राहिलेले दर नंतर असे काही पाडले जातात, की नको ते कांदा पीक, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी आपल्याला काही देणेघेणे नाही का, असा प्रश्‍न उपस्थित करीत समस्त कांदा उत्पादकांचे दुःख व्यक्त केले आहे.

नगरसूल येथील तरुण शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी कांद्याच्या कोसळलेल्या दराबाबत शासनाविरोधात नाराजी व्यक्त करून संताप व्यक्त करण्यासाठी दीड एकर कांदा पीक जाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी डोंगरे यांनी ५ मार्च, होळीच्या दिवशी आपल्या शेतावर कांदा अग्निडाग करण्यात येणार असल्याचे जाहीर करून पत्रिका छापल्या आहेत.

या पत्रिकेत चि. कांदा- (सर्वच शेतकऱ्यांचा लाडका व शेतकऱ्यांना खड्यात गाडून टाकणारा) तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य-कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे नाव छापण्यात आले आहे. प्रेषक म्हणून महाराष्ट्रातील मीडिया, संयोजक महाराष्ट्रातील शेतकरी संघटना आणि व्यवस्थापक म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी, अशी निमंत्रणपत्रिकेत रचना केली आहे.

ही निमंत्रणपत्रिका शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींसह सर्वच आमदार, खासदार, राजकीय नेत्यांना पाठविली आहे. त्या सोबतच स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कांदा जाळण्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी कांदा पीक जळण्यासाठी तयार केलेली पत्रिका सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये व जिल्हाभरात चर्चेचा विषय झाला आहे.

---

वीज, सिंचन, हमीभाव, आरोग्य, शिक्षण, मुला-मुलींचे लग्न असे अनेक यक्ष प्रश्न भेडसावत असतानाच आज कांदा शेतकऱ्यांना रडवतोय. गेंड्याची कातडी परिधान केलेल्या सरकारचे लक्ष वेधून निषेध व्यक्त करण्यासाठी मी कांदा जाळण्याचा जाहीर कार्यक्रम आखला आहे.

- कृष्णा डोंगरे, शेतकरी नगरसूल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com