केंद्राच्या निर्यातबंदीच्या धोरणामुळेच कांदा उत्पादक संकटात आले

येवल्यातील कांदा परिषदेत सरकारला घेराव घालण्याचा इशारा दिला.
Farmers in Yeola meeting
Farmers in Yeola meetingSarkarnama

येवला : सरकारच्या (Centre) धोरणामुळे बांगलादेशसारख्या देशाने सौदे पूर्ण केले नाहीत, म्हणून आपला कांदा विकत घ्यायचा नाही, असा निर्णय घेतला असून, आखाती देशांनीसुद्धा येमेनसारख्या कांदा उत्पादन करणाऱ्या देशातून कांदा खरेदी सुरू केल्याने निर्यातबंदीच्या धोरणामुळे आपल्या कांद्यावर गदा आल्याचे सांगत, याप्रश्नी सरकारला घेराव घालण्यात येईल, असा इशारा कांदा परिषदेत शेतकरी संघटनेचे (Farmers orgnisation) राज्याध्यक्ष ललित बहाळे यांनी दिला. (Farmers warns centre government on Onion export poliry)

Farmers in Yeola meeting
राज ठाकरेंना अडवणाऱ्या पहिलवान, साधूंनी आदित्य ठाकरेंचे दिमाखदार स्वागत केले!

येथील बाजार समितीच्या सभामंडपात शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेतर्फे राज्यस्तरीय कांदा उत्पादन व व्यापार परिषदेत श्री. बहाळे यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. आजच्या कांदा परिषदेत शेतकरीहिताचे १० ठराव संमत करण्यात आले. ‘पाटण्याच्या बाजारात नाफेडचा कांदा विक्रीसाठी उतरू दिला जाणार नाही, ज्यांनी नाफेडला कांदा विकला आहे, त्यांनीही या आंदोलनात सामील व्हावे, यापुढे प्राप्तिकर, ईडी आणि पोलिसांचा कांद्याचे भाव पाडण्यासाठी वापर केला तर आम्हीही तयार आहोत,’ असा इशाराही त्यांनी दिला.

Farmers in Yeola meeting
राहुल गांधींच्या धास्तीनेच पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ!

‘निर्यातबंदी, भाववाढ, जनतेच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब जोपर्यंत सरकारमध्ये उमटत नाही तोपर्यंत सरकार जनतेसाठी निरुपयोगी असते. गेल्या ४२ वर्षांपासून कांद्याचा प्रश्न भिजत पडला असून, तो सुटत नाही हे खेदजनक आहे. खर्च भरून निघेल एवढा भाव शेतमालाला मिळालाच पाहिजे, साधने घेऊ शकेल इतकी संपत्ती शेतकऱ्यांची नसेल तर शेतीप्रधान देश आपण कसे काय म्हणू शकतो, असा सवाल माजी आमदार चटप यांनी केला.

जीवनावश्‍यकच्या यादीतून वगळा

ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील यांनी सरकारच्या धोरणांवर टीका करताना जीवनावश्यक यादीतून कांदा वगळला जात नाही तोपर्यंत कांद्याचे भाव असेच कोसळत राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता लढले पाहिजे, अशी आर्त साद घालत वेळ पडल्यास संसदेला घेराव घालण्याचा इशारा दिला. महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्रप्रमुख सीमा नरवडे यांनी सरकारच्या आयात-निर्यातीच्या धोरणावर टीका केली. केंद्र सरकार नेहमी निर्यातबंदीच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करत असल्याने कांद्याचे दर पडतात. या वर्षी देशात पाच राज्यांच्या निवडणुका होत्या म्हणून कापसाची निर्यातबंदी प्रथमच झाली नाही. जीएम तंत्रज्ञानाचे बियाणे आपल्या देशात का मिळत नाही, हा सवाल सरकारला विचारायला हवा, असे सांगत धोरणात्मक बदल झाला तरच शेतकऱ्यांच्या खिशात पैसे येतील, असेही त्या म्हणाल्या.

नाफेड बंद करायला हवे

नाफेड ही शेतकऱ्यांसाठी व्यवस्थाच नसून ती बंद करायला हवी, असे मत देवीदास पवार यांनी मांडले. युवा आघाडीचे अध्यक्ष सुधीर बिंदू यांनी नाफेडचा कांदा विक्रीसाठी आणल्यास त्याच ठिकाणी हा कांदा जाळून टाकू, नाफेडची राज्यातील कार्यालये बंद पाडू, असा इशारा दिला. शंकरराव ढिकले यांनी ठराव मांडले.

गेल्या २३ मेपासून राज्याध्यक्ष बहाळे यांच्या ७२ सभा झाल्या असून, त्या सभांमधून आलेल्या सूचनांचे ठराव परिषदेत मंजूर करण्यात आले. संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे यांनी स्वागत केले. शशिकांत भदाणे, महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रज्ञाताई बापट, मधुसूदन हरणे, राजाभाऊ पुसदेकर, अनिस पटेल, किरण पाटील, बाबासाहेब गुजर यांची भाषणे झाली. बापूसाहेब पगारे यांनी सूत्रसंचलन केले. परिषदेच्या सुरवातीला ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com