भाजपच्या कारभाराची सत्ताधारी, विरोधकांकडून चिरफाड!

महासभेत नगरसेवक म्हणाले, बिलासाठी एकच लिकेज तीनवेळा काढतात
Dhule corporation
Dhule corporationSarkarnama

धुळे : सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकला नसल्याने दिवाळीत नागरिक शुभेच्छा देण्यासाठी नव्हे, तर तक्रारी घेऊन घरी येत होते. पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांची दिवाळी चांगली गेली नाही. पाणी १२ ते २५ दिवसांतून येते, रात्री दोन- दोन वाजता पाणीपुरवठा होतो, (Water supply) गळती काढली जात नाही, अशा समस्यांचा संतप्त नगरसेवकांनी (Corporators) भडिमार केला. ( Ruling BJP & Opposition criticised Dhule corporation BJP)

Dhule corporation
Important: टोलनाक्यावर ७ मिनिटांची मुदत, अन्यथा टोल देऊ नये?

एलईडीप्रश्‍नी आम्ही पैसे देतो पण किमान पथदीप लावा, अशी विनंतीही नागरिकांनी केली. अशा विविध संतप्त भावना सत्ताधारी भाजप व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महासभेत मांडल्या. त्या लक्षात घेता महापौरांनी अधिकाऱ्यांना तुमच्याकडून कामे होत नसतील तर तुम्हाला सुट्टी देतो, अशा शब्दात उद्विग्नता मांडली.

Dhule corporation
आमदार किशोर पाटील देणार हजार तरुणांना रोजगार देणार!

महापालिकेच्या सभागृहात सोमवारी महासभा झाली. महापौर प्रदीप कर्पे, आयुक्त देवीदास टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ व्यासपीठावर होते. नगरसेवक, अधिकारी वर्ग उपस्थित होता. सभेत सत्ताधारी भाजपचे नगरसेवक भगवान गवळी यांनी प्रथम बोलू न दिल्याने त्यांनी सभात्याग केला. तत्पूर्वी, याच मुद्द्यावरून महापौर कर्पे व श्री. गवळी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

रात्री दोनला पाणीपुरवठा

दिवाळीसह गेल्या सण- उत्सवांच्या काळात व सद्यःस्थितीतही शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याचा मुद्दा सत्ताधारी भाजपसह विरोधी सदस्यांनी उपस्थित केला. विरोधी पक्ष नेते कमलेश देवरे यांनी देवपूरमधील नागरिकांची दिवाळी चांगली गेली नसल्याचे सांगत पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला, अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही समस्या सुटली नसल्याचे सांगितले. अमोल मासुळे, वंदना भामरे, अमीन पटेल, आरती पवार, सुनील बैसाणे, सईद बेग, नाजियाबानो पठाण, भारती माळी, रावसाहेब पाटील आदींनी पाण्याची समस्या मांडली. नवरात्रोत्सवातही नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. तसेच रात्री दोन- दोन वाजता पाणीपुरवठा होतो. दहा- बारा दिवस पाणीपुरवठा होत नाही. मुस्लिम नगर भागात १२ ते २५ दिवसात पाणीपुरवठा होतो, अशी समस्या या संतप्त सदस्यांनी मांडली. प्रभागांमध्ये ३०- ३० ते ४०- ४० लिकेजेस असल्याने पाणीपुरवठा कसा होईल, वर्षानुवर्षे लिकेजेसचा प्रश्‍न मांडतोय, एकच लिकेज तीन- तीनवेळा काढले जातात, बिले काढली जातात, असे संतप्त नगरसेवकांनी सांगितले.

महापौरांकडून पुन्हा इशारा

सर्वपक्षीय नगरसेवकांच्या भावना लक्षात घेता महापौर कर्पे यांनी पाण्याच्या तक्रारी सोडविताना क्युरी काढू नका असे म्हणत कामे करायची नसतील तर तसे सांगा नगरसेवकांची पत्रे घेऊन तुम्हाला सुट्टी देतो, असा इशारा अधिकाऱ्यांना दिला. तीन दिवसात पाण्याचे नियोजन करा, अवैध नळ कनेक्शनधारकांवर कारवाई करा, असा आदेश दिला. अक्कलपाडा योजनेचे काम प्रगतिपथावर असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पाणी देऊ असेही श्री. कर्पे म्हणाले. तीन नामकरणाचे व भूसंपादनाचा विषय वगळता इतर विषय मंजूर करण्यात आले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in