Shivsena: एक गुलाबराव गेला, पण माझ्याकडे गुलाबाची बाग आहे!

उद्धव ठाकरे यांनी जळगावच्या शिवसेना कार्यकर्त्यांना सांगितले, आपण पुन्हा नवीन गुलाब फुलवू.
Uddhav Thakrey
Uddhav ThakreySarkarnama

जळगाव : ज्यांना मोठे केले, ते आता आपल्यासोबत नाहीत. (Rebel are not with us) मात्र, त्यांना मोठे करणारे तुम्ही माझ्यासोबत आहात. तुमच्यात ताकदीवर त्यांना धडा शिकवू. गुलाबाचे झाड माझ्याकडे आहे. त्यातून पुन्हा नवीन गुलाब फुलवीन, असे मत शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) यांनी व्यक्त केले. (Jalgaon party workers meet Shivsena part leadrs)

Uddhav Thakrey
Shiv Sena Crisis : सत्तासंघर्षावर आज 'सुप्रीम' सुनावणी : काय होणार ? संपूर्ण राज्याचं लक्ष

जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांना शिवसैनिकांचे प्रतिज्ञापत्राचे गठ्ठे सादर केले.

Uddhav Thakrey
Shivsena : अकोल्यात ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाची नवीन कार्यकारिणी जाहीर

जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, हर्शल माने, जिल्हा महानगरप्रमुख शरद तायडे, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, दीपक राजपूत यांनी मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांना प्रतिज्ञापत्राचे गठ्ठे सादर केले. या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, की त्यांनी आजपर्यंत गुलाब पाहिले. मात्र, गुलाबाला काटेही असतात. आता त्यांनी काटेही पाहावेत. आपल्याकडे गुलाबाचे झाड आहे, त्यातून आपण नवीन गुलाब फुलविणार आहोत. तुमची साथ अशीच माझ्यासोबत राहू द्या.

ठाकरे म्हणाले, तुम्ही पक्षबांधणीचे काम जिल्ह्यात जोरात करा. मला असेच आणखी प्रतिज्ञापत्राचे गठ्ठे हवे आहेत. आपली पक्षाची लढाई दोन पातळीवर सुरू आहे. रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई. मात्र, या दोन्ही लढाईत आपण कुठेही मागे पडणार नाहीत. न्यायालयीन लढाईत दिग्गज वकील कायद्याची लढाई लढत आहेत. न्याय देवतेवर आपला विश्‍वास आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com