महसूलच्या प्रत्येक बदलीत एक-दीड कोटींची वसुली!

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची राज्य शासनावर टिका.
Pravin Darekar News
Pravin Darekar NewsSarkarnama

नाशिक : महसूल विभागाच्या (Revenue) बदल्यांमध्ये वसुली होत आहे. प्रत्येक बदली, नियुक्तीत एक-दीड कोटी रुपयांची वसुली होत आहे. शहरातील पदासाठी पाच पाच कोटी रुपये मागितले जात आहेत, याच्या चौकशीची मागणी मी करत आहे. मात्र सरकार (Government) त्याकडे कानाडोळा करते, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. (Pravin Darekar made allegations on state Government)

Pravin Darekar News
राज्यकर्त्यांनी हर्बल गांजा ओढणे सोडावे!

ते म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे घोटाळेबाजांचे वसुली सरकार आहे. यातील मंत्र्यांना घोटाळ्याचा चौकशीत नव्हे तर चौकश्‍या दडपण्यात रस आहे. (Pravin Darekar News)

श्री. दरेकर यांनी सरकारला नाशिक महापालिकेतील म्हाडा आणि भूसंपादन घोटाळ्याच्या चौकशीची जाहीर आव्हान दिले. ते म्हणाले, की अनेक मंत्री आणि अधिकारीसुद्धा हेच करताहेत. मी महापालिकेतील म्हाडा घोटाळ्याचा विषय मांडल्यावर केवळ कागदावर कारवाई होते.

Pravin Darekar News
राज्यसभा निवडणूक : शिवसेनेत रणकंदन; आमदारांचा मुक्काम पुन्हा ट्रायडंटमध्ये

ते म्हणाले, सत्ता कुणाचीही असो, म्हणूनच मग ती नाशिक महापालिकेतील भूसंपादन चौकशी असो, म्हाडातील असो, राज्य सरकारने चौकशी केलीच पाहिजे, यासाठी मी पुन्हा चौकशीची आणि कठोर कारवाईची मागणी करत आहे, असे सांगत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला खुले आव्हान दिले.

राज्यसभा निवडणुकीविषयी ते म्हणाले, ‘‘आमदार विकाऊ वस्तू नाही, ते एकटे नाही, तीन लाख लोकांमध्ये तुम्ही संशय निर्माण करताहेत. तुम्हाला समर्थन द्यायचे की नाही हे अपक्ष म्हणताहेत, तुमच्याकडे सीआयडी आहे, पोलिस आहेत, त्यांच्याकडून तपास करा, पराभूत होणार आहात म्हणून अशी कारणे दाखवत आहात.’’ महापालिकेतील म्हाडा प्रकरणाविषयी ते म्हणाले, ‘‘आमच्या काळात भूसंपादन घोटाळा झाला असेल तर पाठीशी घालणार नाही, आमचा घोटाळा असेल तर लवकर कारवाई करावी,’’ असे आव्हान श्री. दरेकर यांनी दिले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com