घरावर नाव लावण्यासाठी लाच घेणारे सापळ्यात अडकले

जळगाव येथे लाच घेतल्याने अटक करण्यात आलेले सहकार अधिकारी विजय गोसावी व सहाय्यक सहकार अधिकारी चेतन राणे.
घरावर नाव लावण्यासाठी लाच घेणारे सापळ्यात अडकले
Vijay Gosavi & Chetan raneSarkarnama

जळगाव : नुकत्याच खरेदी केलेल्या घराची दप्तरी नोंद करून ताबा पावती देण्याच्या मोबादल्यात पाच हजाराची लाच मागणाऱ्या उपनिंबधक (Sub Registrar) सहकार या अधिकाऱ्यासह सहाय्यक सहकार अधिकारी यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईमुळे जिल्हाधिकारी (Collector) कार्यालयात आज दुपारी एकच खळबळ उडाली. (Officer arrest Sub registrar for deemands Bribe)

Vijay Gosavi & Chetan rane
खडसेंच्या उमेदवारीने राष्ट्रवादी करणार गिरीश महाजनांची कोंडी?

तक्रारदार यांनी सिंधी कॉलनी भागात घर खरेदी केले आहे. खरेदी केलेल्या घराची दप्तरी नोंद करून त्याबाबतची ताबा पावती देण्याच्या मोबादल्यात उपनिंबधक सहकारी संस्थेत काम करणारे सहकार अधिकारी विजय सुरेशचंद्र गोसावी (वय ५४ रा. आशा बाबा नगर) आणि सहाय्यक सहकार अधिकारी चेतन सुधाकर राणे (वय ४८, रा. गणेश कॉलनी, जळगाव) यांनी पाच हजाराच्या लाचेची मागणी केली.

Vijay Gosavi & Chetan rane
Rajesh Tope : एकदा हा विश्वास तुटला तर तो पुन्हा मिळणे अशक्य ; टोपेंचं टि्वट

लाच द्यायची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात संपर्क करून या बाबत लेखी तक्रार केली. तक्रारीची चौकशी केल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सतीष भामरे यांच्यासह पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत लाचखोर अधिकाऱ्यांना अटक करण्यासाठी सापळा रचला होता.

या प्रकरणात निरीक्षक एन. एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, शैला धनगर, मनोज जोशी, जनार्दन चौधरी, सुनील शिरसाट, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना ताब्यात घेतले. जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून संशयितांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in