विधानसभेत प्रश्‍न उपस्थित होताच अधिकारी, नेत्यांचे धाबे दणाणले

हिंगोणा गैरव्यवहारप्रकरणी अनेकांवर कारवाईचे संकेत
MLA Shirish Choudhary
MLA Shirish ChoudharySarkarnama

हिंगोणा : येथील दलित वस्ती अंतर्गत ऑनलाइन निविदेत हस्तक्षेप केल्याप्रकरणी आमदार शिरीष चौधरी (Shirish Choudhary) यांनी अधिवेशनात प्रश्‍न केल्यानंतर ग्रामविकास अधिकारी (ZP) यांच्यावर निलंबनाची (Suspension) कारवाई करून चौकशीचे आदेश देण्यात आले. दरम्यान, या गैरप्रकाराबाबत विधानसभेत प्रश्‍न उपस्थित होताच भ्रष्ट अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

MLA Shirish Choudhary
खासदार गोडसेंचा चिमटा, देवयानी फरांदेंना ४ वर्षांनी जाग आली काय?

येथील दलित वस्ती निधीचा गैरवापर व ऑनलाइन निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करून आर्थिक व्यवहार व काळाबाजार करून दलित वस्तीच्या निधीचा अपहार करू पाहणारे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व त्यांचे नातेवाईक या सर्वांची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिले. या प्रकरणात दलित वस्ती योजनेअंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी दहा लाख तसेच महिला शौचालय उभारणीसाठी सहा लाख निधी दलित वस्तीसाठी मंजूर झाला होता.

MLA Shirish Choudhary
खासदार भामरे यांच्याकडून श्रेयवादासाठी पुलाचे दुसऱ्यांदा भूमिपूजन!

दहा लाख रुपये ई टेंडर काढून ई निविदा काढून ग्रामपंचायतीने कुठल्याही वृत्तपत्रात नोटीस, फलकावर किंवा दवंडी न देता तसेच स्थानिक लोकांचा वाद दाखवून ई-टेंडर निविदेला तूर्त स्थगिती दिली आणि आर्थिक लाभापोटी टेडर ई निविदा रिओपन न करता मासिक सभेमध्ये ऑफलाईन टेंडर विनायक अडकमोल यांना देण्यात आले. तसेच ग्रामपंचायतीने कुठलीही वर्कऑर्डर न देता दहा लाख रुपयांचे काम परस्पर सुरू केले. या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन या दलित वस्तीच्या कामात गैरप्रकार व आर्थिक व्यवहार झाल्याची तक्रार केली.

संबंधितांनी ही निविदा रद्दबातल करून आपल्या पद्धतीने काम सुरू केले असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले. यावल येथील तहसीलदारांनी आतापर्यंत या संदर्भातील विषयावर काय कारवाई केली, या प्रश्नात स्थानिक ग्रामस्थ मात्र संभ्रमातच आहेत. दरम्यान, आमदार शिरीष चौधरी यांनी हा गैरप्रकार सरपंच, ग्रामविकास अधिकारी, सदस्य यांच्या संगनमताने झाला असल्याची माहिती विधानसभेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर मांडून त्यावर ग्रामविकास मंत्री यांनी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच यावेळी कारभारात समाविष्ट असलेले सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच अन्य अधिकारी यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यावल तालुक्यातील टाळूवरचे लोणी खाऊ पाहणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com