शरद पवारांना धमकावणारा निघाला नाशिकचा निखिल भामरे!

वसतिगृहात राहणाऱ्या निखिल भामरेच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह डेटा
शरद पवारांना धमकावणारा निघाला नाशिकचा निखिल भामरे!
Nikhil Bhamre with PoliceSarkarnama

नाशिक : `वेळ आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची` या आक्षेपार्ह ट्वीटचा स्क्रीन शॅाट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jeetendra Awhad) यांनी शेअर केला. पक्षाच्या (NCP) कार्यकर्त्यांनी त्याचा शोध घेतल्यानंतर, निखिल भामरे हा युवक पोलिसांच्या (Police) हाती लागला आहे. त्याच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह डेटा आढळल्याने खळबळ उडाली आहे. ( Dindori Police arrest Offensive tweeter Nikhil Bhamre at Nashik)

Nikhil Bhamre with Police
शिवसेनेच्या `धर्मवीर`ची भाजपच्या `काश्मीर फाईल्स`ला टक्कर!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शरद पवार यांच्याविरुद्ध निखिल भामरे नावाच्या तरुणानं आक्षेपार्ह ट्वीट केलं आहे. या तरुणाविरोधात कारवाई करावी असं ट्वीट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. यानंतर निखिल भामरेला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आणखी काही आक्षेपार्ह मजकूर निखिलच्या मोबाईलमध्ये आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Nikhil Bhamre with Police
`अहो मिडियाला कळते ते तुम्हाला का कळत नाही`

जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या निखिल भामरेच्या ट्वीटच्या स्क्रिनशॉमध्ये 'वेळ आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची' असा मजकूर लिहिलेला होता.

याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या नावाने अकाउंट उघडून धमकी देणाऱ्या युवकाबाबत माहिती मिळालावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी जिल्हा भरातील पदाधिकाऱ्यांना निखिल भामरे (ता. बागलान, जि. नाशिक) याचाशोध घेण्यास सांगितले. रात्री उशिरा हा युवक दिंडोरी येथे असल्याचे समजले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्यामराव हिरे, तोसिफ मनियार यांना त्यास पकडून दिंडोरी पोलीसांच्या ताब्यात दिले. निखिल भामरे यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आपल्या स्टाईलने त्याच्या पालकांना समोर समज दिली. दिंडोरी पोलीसांत त्याच्या विरोधात आज कलम २९४,१५३(अ), ५००, ५०१, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस निखिल भामरे यास नाशिक, कळवा, आणि बारामती पोलीसांत देखील गुन्हा असल्याने न्यायालयाच्या माध्यमातून पुढील तपासासाठी त्या पोलिसांच्या ताब्यात देणार आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले,

निखिल भामरेच्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, काय पातळी वर हे सगळे होते आहे. या विकृत इसमा विरुद्ध कडक कारवाई करा. या ट्वीटमध्ये आव्हाडांनी मुंबई, महाराष्ट्र पोलिसांनी टॅग केलं होते.

दरम्यान शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडल विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या तक्रारीनंतर भामरे विरोधात कलम १५३, १०७, ५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद झाली.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.