आमदार फारूक शहा यांनी रोखली पेट्रोलची फसवेगिरी

धुळे जिल्ह्यात पेट्रोल पंपावर आता पारदर्शक नळीचा वापर सुरु झाला.
MLA Faruk Shah
MLA Faruk ShahSarkarnama

धुळे : जिल्ह्यात (Dhule) काही पेट्रोल पंपावर (Fuel pump) पेट्रोल-डिझेल कमी प्रमाणात दिले जाते. याबाबत जिल्हाधिकारी (Revenue Department) व पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार आल्या होत्या. याबाबत आमदार फारूक शाह (MLA Faruk Shah) यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर पारदर्शक नळीचा वापर सुरू झाला आहे. यातून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक टळेल असा दावा आमदार शाह (AIMIM MLA) यांनी केला आहे. (MLA Faruk shah took awareness of citizen complains of Fuel)

MLA Faruk Shah
कामाख्या देवी पावली?,१२ माजी नगरसेवक शिंदे गटात

इंधनाचे दर आकाशाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. दरवाढीमुळे सरकार विरोधात नागरिकांच्या भावनी तीव्र आहेत. त्यातच पेट्रोल पंपावर मापात पाप सुरु होते. त्याविरोधात आमदार शाह यांनी पाठपुरावा केला.

MLA Faruk Shah
धक्कादायक; अवैध धंद्यांत ‘पोलिसांची’ पार्टनरशीप?

जिल्ह्यात काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरताना ते कमी प्रमाणात दिले जात असल्याबाबत नागरिकांनी आपल्या आमदार कार्यालयाकडे केली होती. त्या अनुषंगाने २३ मार्च २०२२ ला जिल्हाधिकारी व पुरवठा अधिकारी यांना याबाबत पत्र दिले होते. पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले असून कामगार तसेच सामान्य नागरिकांना पेट्रोल व डिझेल खरेदी करणे दुरापास्त झाले आहे.

जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल कमी देणे तसेच, मशिनमध्ये फेरफार करून ग्राहकांना कमी प्रमाणात पेट्रोल देणे आदी तक्रारी आमदार कार्यालयास प्राप्त झाले आहेत. काही वर्षापासून कंपनीचे अधिकारी तसेच आपण याबाबत किती वेळा या पंपांवर तपासणी केली याची माहिती मिळावी. तसेच पेट्रोल देताना धुळे जिल्ह्यात काळ्या नळीचा वापर करण्यात येतो. त्यामुळे ग्राहकांना पेट्रोल टाकताना ते दिसून येते नाही.

आपल्या स्तरावर आपण आदेश देऊन पारदर्शक नळीचा वापर करण्यासंदर्भात पेट्रोल पंप चालकांना आदेशित करावे अशी मागणी आपण या पत्राद्वारे केली होती. या पत्राची दखल घेत धुळे जिल्ह्यात पेट्रोल पंपावर पारदर्शक नळी बसविण्यात आल्या आहेत असा दावा आमदार श्री. शाह यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in