आता या भाजप नेत्याने दिला ‘पुन्हा आलो’चा नारा!

महापौरपदासाठी १९ जुलैला विशेष सभा होणार असून प्रदिप कर्पे पुन्हा महापौर होणार का याची उत्सुकता.
Pradeep Karpe News, Dhule Latest Marathi news, BJP News, Political News
Pradeep Karpe News, Dhule Latest Marathi news, BJP News, Political NewsSarkarnama

धुळे : सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme court) आदेश व शासकीय अभियोक्ता ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड यांच्या अभिप्रायानुसार राज्य शासनाच्या (Maharashtra) नगर विकास विभागाने धुळे (Dhule) महापालिकेतील महापौरपद खुले (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी जाहीर केले आहे. त्यानंतर महापौरपदी पुन्हा एकदा भाजपचे (BJP) प्रदीप कर्पे (Pradeep Karpe) यांनाच संधी मिळेल की अन्य कुणाच्या गळ्यात माळ पडेल याची उत्सुकता आहे. दरम्यान, महापौर निवडीसाठी १९ जुलैला विशेष सभा होणार आहे. (Dhule mayor election meeting will be on 19th jully)

Pradeep Karpe News, Dhule Latest Marathi news, BJP News, Political News
रूपाली चाणकरांनी ठणकावले, ...तर सरपंचाचे पद रद्द करू!

येथील महापौरपदाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होती. या याचिकेचा निकाल १७ मे २०२२ ला लागला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या एक दिवस आधीच १६ मे २०२२ ला तत्कालीन महापौर प्रदीप कर्पे यांनी आपल्या महापौरपदाचा राजीनामा दिला होता. या घडामोडींनंतर महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी निघेल याची प्रतीक्षा होती. सोमवारी (११ जुलै) ही प्रतीक्षा संपली. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने न्यायालयाचा आदेश व शासकीय अभियोक्ता ॲडव्होकेट-ऑन-रेकॉर्ड यांच्या अभिप्रायानुसार महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी घोषित केले.(Dhule Latest Marathi news)

Pradeep Karpe News, Dhule Latest Marathi news, BJP News, Political News
राज्य सरकारला दणका; OBC आरक्षणाशिवाय ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर

या घोषणेनंतर महापौरपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू झाली. महापौरपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत, विविध नगरसेवकांची नावे चर्चेत आली आहेत. असे असले तरी न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रदीप कर्पे यांनी मुदतीपूर्वीच राजीनामा दिला होता. श्री. कर्पे यांना केवळ आठ महिने महापौरपद मिळाले. या पार्श्वभूमीवर श्री. कर्पे यांनाच पुन्हा संधी देऊन त्यांना मिळालेल्या कार्यकाळाची भरपाई देण्याचा प्रयत्न असण्याची दाट शक्यता आहे.(Political News updates)

वर्षभरानंतरच नवीन पंचवार्षिक निवडणुकीची धामधूम सुरू होईल. त्यामुळे सरत्या काळात हे पद नकोच असाही एक सूर असल्याने इतर इच्छुक किती प्रयत्न करतात हा प्रश्‍नच आहे. असे असले तरी पुन्हा संधी मिळेल की नाही त्यामुळे संधी मिळत असेल घ्यावी असा विचार असणारे तसेच नावापुढे महापौरपद लागले तरी भरपूर असाही विचार करणारी मंडळी आहे. आणि राजकारणात कुणाची लॉटरी कधी लागेल आणि कुणाचा पत्ता कधी कट होईल याची शाश्‍वती नसते त्यामुळे सत्ताधारी भाजपकडून अधिकृतरीत्या कुणाचे नाव जाहीर होत नाही तोपर्यंत महापौरपदावर कुणाची वर्णी लागेल याची उत्सुकता कायम असणार आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर

महापौरपदाच्या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांनी विशेष सभा घेण्याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यानुसार १९ जुलैला सकाळी अकराला ही विशेष सभा होईल. या विशेष सभेला विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी जलज शर्मा हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील. ही बैठक प्रत्यक्ष उपस्थितीने घेण्यात यावी, बैठकीची व्यवस्था नगरसचिवांनी पीठासीन अधिकाऱ्यांशी चर्चा करून निश्‍चित करावी असेही पत्रात नमूद केले आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in