आपलीच सत्ता असल्याने आता विकासाला अडसर नाही!

खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत शहराचे महापौर कर्पे यांनी पदभार स्विकारला.
Dhule Mayor Pradeep Karpe
Dhule Mayor Pradeep KarpeSarkarnama

धुळे : राज्यात (Maharashtra) पुन्हा आमचे अर्थात शिंदे- फडणवीस (Eknath Shinde Government) सरकार सत्तेत आल्याने महापालिका (Dhule Corporation) क्षेत्रात विकासाला निधीचा अडसर राहणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे पाठबळ राहील, अशी हमी खासदार डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांनी सोमवारी दिली. महापौरपदाचा पदभार प्रदीप कर्पे (Pradeep Karpe) यांनी स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. (Mayor Pradeep karpe take charge in the presencs of Dr. Subhash Bhamre)

Dhule Mayor Pradeep Karpe
`साहेब, आम्ही गद्दार नाही ,तुम्हाला सोडून जाणार नाही`

माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, उपमहापौर अनिल नागमोते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, डॉ. माधुरी बोरसे, राजेश पवार, हिरामण गवळी, विजय पाच्छापूरकर, सुभाष जगताप, मायादेवी परदेशी, आरती पवार, वैशाली शिरसाट आदी उपस्थित होते.

Dhule Mayor Pradeep Karpe
चंद्रकांत रघुवंशी आमदारकीच्या लालसेने शिंदे गटात गेले!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक, माजी स्थायी सभापती युवराज पाटील यांच्या निधनामुळे साध्या पद्धतीने महापौर पदग्रहणाचा कार्यक्रम झाला.

खासदार डॉ. भामरे यांनी प्रलंबीत विकासाची कामे मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले. यानंतर श्री. कर्पे म्हणाले, शहराचा पाणीपुरवठा, खड्डे, साथरोग पसरू नये म्हणून फवारणी, स्वच्छता, पथदिव्यांचे प्रश्‍न मंगळवारपासून नित्यनियमाने हाताळले जातील. नागरिकांचे समाधान होईल, अशा पद्धतीने कामकाजावर भर राहील.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in