`ओबीसी`ची कत्तल होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
Chhagan BhujbalSarkarnama

`ओबीसी`ची कत्तल होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी गणनेच्या माहिती संकलनाबाबत आक्षेप घेतला आहे.

नाशिक : मागच्या काही दिवसांत जी माहिती देण्यात आली. त्यामध्ये असे लक्षात आलं आहे की, सॉफ्टवेअरमध्ये जी नावं फिड करण्यात आली आहेत ती विशिष्ट जातीची आहेत. परंतु एकच आडनाव अनेक जातींमध्ये असते. त्यामुळे जी नावे घेतली जात आहे, ते चुक आहे. याबाबत शासनाने (State Government) तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा `ओबीसी` (OBC) घटकांची कत्तल होईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. (OBC Information feedingon basis of surname Should stop)

Chhagan Bhujbal
मी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणूनच बघतो!

ते म्हणाले, सध्या ओबीसी समाज घटकांबाबत जी माहिती फीड केली जात आहे, ती चुकीची आहे. याबाबत तातडीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे.

Chhagan Bhujbal
सामान्यांच्या प्रश्नावर लढल्यानेच गांधी कुटुंबियांवर `ईडी`ची त्रास!

श्री. भुजबळ म्हणाले, सॅाफ्टवेअरमध्ये अशाच पद्धतीने माहिती भरण्यात येत असेल तर ते चुकीचे ठरेल. त्याबाबत वेळोवेळी सुचान केल्या आहेत. तरी देखील असचं होणार असेल तर यामुळे अडचण निर्माण होणारं आहे. आमचं म्हणणं आहे की, मतदान ओळखपत्र घ्या आणि त्याआधारे माहिती गोळा करा. परंतु असं होताना पाहायला मिळतं नाही.

ते पुढे म्हणाले, मोठया शहरात पाच टक्के आणि सहा टक्के ओबीसी आहेत, असा डेटा गोळा केला आहे. असं कसं असू शकतं. झोपडपट्टीत राहणारे एक तर दलित आहेत किंवा ओबीसी आहेत. मग तरी लोकसंख्या कमी कशी काय?.

ओबीसी समाजाच्या जीवनाचा विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोप केले आहेत ते यंत्रणेने तपासून घ्यायला हवे.

यावेळी त्यांनी शरद पवार हे राष्ट्रपती पदासाठी उमेदवार नसतील. त्यांनी त्यास नकार दिला आहे, अशी माझी माहिती आहे, असे सांगितले.

राहुल गांधींची चौकशी गैर आहे

ते म्हणाले, सध्या रोज विरोधी पक्षाच्या नेत्यांवर धाडी सुरू आहेत. हे रोजचं झालं आहे. राहुल गांधी यांना तीन दिवस सलग चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे. देशासाठी ज्यांनी जीवन अर्पण केलं त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे, हे दुर्दैवी आहे.

ते पुढे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीमध्ये आम्हीं एकत्र आलो त्यावेळी तिन्ही पक्षांनी आपले वैचारीक धोरण बदलावे असे कोणीही म्हणालेला नाही. तसे काहीही झालेले नाही. प्रत्येकाने आपली राजकीय विचारसरणी सोडावी असं आम्हीं बोललो नाही. त्यामुळें कोणी कुठं जायचं तो त्यांचा अधिकर आहे.

कार्यक्रम आमचा, उपस्थिती त्यांची!

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाबाबत ते म्हणाले, मुख्यमंत्री नसतील तर उपमुख्यमंत्री यांना बोलायला द्यायला हवं होतं. तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांना त्याचं स्टेजवर बोलायला देतात. आणि उपमुख्यमंत्राना बोलायला देत नाही हे योग्य नाहीं. कालचा राजभवनच्या कार्यक्रमात कोणा मंत्र्याला बोलावलंच नव्हतं. कार्यक्रम आम्ही केलेल्या कामाचा आणि आम्हाला निमंत्रण नाही. हे योग्य नाही. मी याबाबात विचारणा केली परंतु त्यांच्याकडून कोणताच रिप्लाय आला नाही. मी इतर मंत्र्यांना देखील विचारलं परंतु त्यांना देखील निमंत्रण नव्हतं. मात्र दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांची मोठी गर्दी त्याठिकाणी होती.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in