इगतपुरी काँग्रेसमय झाली, इतरांनी सत्तेची स्वप्न पाहणे बंद करावे!

इगतपुरी मतदारसंघात काँग्रेसची घौडदौड वेगात सुरु झाली आहे.
M. L. A. Hiraman Khoskar
M. L. A. Hiraman KhoskarSarkarnama

नाशिक : इगतपुरी तालुक्यात यापुढे जनतेशी नाळ जोडलेला पक्ष म्हणून काँग्रेस असेल. सबंध तालुका काँग्रेसमय झाला आहे. त्यामुळे मागच्या दाराने पक्षात येऊन सत्ता मिळवलेले व संधी पाहून काँग्रेसला दगा देणाऱ्यांनी पुन्हा सत्तेत येण्याचे स्वप्न राहू नये, असा इशारा आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांनी दिला आहे.

M. L. A. Hiraman Khoskar
गिरीश महाजनांनी अद्वय हिरेंकडे नेतृत्व सोपवून `राष्ट्रवादी`ला साईड ट्रॅक केले

घोटी येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. आमदार खोसकर म्हणाले, ‘काँग्रेसमध्ये निष्ठा आणि कर्तृत्वाची जाणीव आहे. गेली ४५ वर्ष निष्ठेने काम करून स्व. गोपाळराव गुळवे यांच्यानंतर प्रदेशस्तरावर काम करण्याची संधी गुरूनंतर शिष्यांना म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी व भास्कर गुंजाळ यांना मिळाली. काँग्रेसच्या पडत्या काळातही साथ न सोडता पक्ष जीवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्यानिमित्ताने इगतपुरी तालुका भाग्यवान ठरला असून तालुक्यातील कॉंग्रेस अधिक बळकट करण्यास यामुळे मदत होईल.

M. L. A. Hiraman Khoskar
छगन भुजबळांनी उचलला साहित्य संमेलन सर्वात्कृष्ट करण्याचा विडा!

ते पुढे म्हणाले, कॉंग्रेसमध्ये मागच्या दाराने येऊन निष्ठेचे धडे आम्हाला देण्याचा प्रयत्न कुणी करू नये. कॉंग्रेसशी गद्दारी करणाऱ्यांना तर चांगलाच धडा शिकवू असो टोला हाणत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी इगतपुरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर कॉंग्रेसचा झेंडा फडकवू. यासाठी वाट्टेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल असे त्यांनी ठणकावून सांगितले.

काँग्रेसला अच्छे दिन येण्यास सुरुवात झाली असून अनेक पक्षातील पदाधिकारी काँग्रेसच्या संपर्कात आहे याचा योग्यवेळी आपण स्फोट करणार आहोत असेही श्री. सकाळे यांनी सांगितले. काँग्रेसच्या अनेक पदाधिकारींनी मनोगत व्यक्त केले. श्री. माळी यांनी काँग्रेस व ओबीसींना न्याय देण्याबरोबरच काँग्रेस बळकट करण्यासाठी प्रयत्न करू. लवकरच विविध पक्षातील पदाधिकारींचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचे संकेत दिले.

काँग्रेसतर्फे राजाराम साळवी सभागृहात नवनियुक्त ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष जनार्धन माळी, प्रदेश चिटणीस भास्कर गुंजाळ यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बेबीताई माळी, जिल्हा चिटणीस देवराम पाटील नाठे, माजी सभापती राजाराम पाटील धोंगडे, गोपाळा लाहंगे, काँग्रेसचे प्रभारी उत्तम भोसले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब वालझाडे, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, आगरी सेना जिल्हा संपर्कप्रमुख सिद्धेश्वर आडोळे, निवृत्ती पाटील कातोरे, दौलत दुभाषे, कमलाकर नाठे, अरुण गायकर, पांडुरंग हंबीर, गोपाळ भगत, सत्तार मणियार, राजू गांगड, बाळासाहेब लंगडे, बाळासाहेब कुकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com