Nashik News; केंद्रीय मंत्री थकले, आता दादा भुसे घालणार केंद्र सरकारला साकडे!

पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती, ‘नाफेड’तर्फे कांदा खरेदीसाठी केंद्राला पत्र पाठवणार.
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama

नाशिक : जिल्हा (Nashik) हा कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांचा (Farmers) जिल्हा आहे. कांदा दर घसरल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यासाठी रोज आंदोलने होत आहेत. याबाबत केंद्रीय (centre) राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी मंत्री पियुष गोयल (Piyush Goyel) यांना निवेदन देखील दिले होते. मात्र प्रश्न सुटला नाही. आता पालकमंत्री दादा भुसेही (Dada Bhuse) पत्र लिहिणार आहेत. केंद्रीय मंत्र्यांना जमेना ते भुसेंना जमेल का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. (Centre minister not able to do will possible for Dada Bhuse)

Dada Bhuse
Nashik News; भुसेंनी उलगडले गुपित...`या`मुळे मिळाले एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण!

जिल्ह्यात कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी आक्रमक झाले असून, रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य दर मिळावा, यासाठी आता राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून, केंद्राने बाजार हस्तक्षेप योजनेच्या माध्यमातून ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदी करावी, असे पत्र राज्य सरकार केंद्राला पाठवणार आहे.

Dada Bhuse
Sanjay Raut News; ‘ती’ शरद पवारांची राजकीय खेळी?

यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागांशी चर्चा करणार आहेत. याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी माहिती पालकमंत्री भुसे यांनी दिली.

जिल्हा परिषदेतर्फे आयोजित ‘मिशन भगीरथ प्रयास’ या उपक्रमाच्या प्रारंभानंतर पालकमंत्री भुसे यांनी गुरुवारी (ता. २३) नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर सरासरी ४०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल इतके गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कांदा विक्रीतून उत्पादन आणि वाहतुकीचा खर्चही निघेनासा झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. पालकमंत्री भुसे म्हणाले, की सध्या हवामानातील बदल, रोगाचा प्रादुर्भाव या कारणांमुळे कांद्याचा हंगाम यंदा लांबणीवर पडला. त्यातच नवीन कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर कोसळले आहेत.

Dada Bhuse
Nashik News; भाजप दत्तक नाशिकला विसरले की काय?

लासलगाव, पिंपळगाव, सिन्नर, मनमाड, चांदवड, नांदगाव या सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याला ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. कांद्याचा उत्पादन खर्च बघितला, तर मिळणार दर खूपच कमी आहे आणि त्यामुळेच कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादनाचा खर्च निघण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाकडे ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसे पत्र केंद्राला पाठवले जाणार आहे.

सध्याचा कांदा हा साठवण्यासारखा नाही. त्यामुळे ‘नाफेड’लाही तो खरेदी करून साठवता येणार नाही, हीदेखील अडचण आहे. तरीदेखील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी आम्ही केंद्राकडे कांदा खरेदीबाबत पाठपुरावा करत आहोत. केंद्र सरकारने बाजार हस्तक्षेप योजनेच्या माध्यमातून कांदा खरेदी करावा, अशी विनंती करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com