...आता राज्यात हमीभावाच्या कायद्यासाठी लढा होणार!

निफाड येथे झालेल्या शेतकरी संघर्ष संघटनेच्या बैठकीत विविध ठराव झाले.
Hansraj Wadghule

Hansraj Wadghule

Sarkarnama

निफाड : नवी दिल्लीच्या सीमेवरील धरणे आंदोलनाच्या (Farmers Agitation) दबावामुळे केंद्र सरकारले कृषी कायदे (agricultural bills) घेण्यास बाध्य केले. मात्र त्यावर लढा थांबणार नाही. यापुढे केंद्र सरकारने घोषणा केलेल्या हमीभावाच्या कायद्यासाठी महाराष्ट्रात संघर्ष सुरु करण्यात येईल अशी घोषणा शेतकरी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज वडघुले (Hansraj Wadghule) यांनी केली.

जिल्हा कार्यकारिणीची बैठक सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहात झाली. या वेळी तालुक्यातील अनेक दिग्गजांनी संघटनेत प्रवेश केला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वडघुले अध्यक्षस्थानी होते.

<div class="paragraphs"><p>Hansraj Wadghule</p></div>
अबब...त्या `गब्बर`ची संपत्ती मोजायला पाच दिवस लागले!

या वेळी विविध ठराव पारीत करण्यात आले. त्यात कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करावी, तेथील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्याचा निषेध, केंद्र सरकारने हमीभावाचा कायदा पारित करून उत्पादन खर्चाच्या दीडपट मूल्य निर्धारित करावे. रानवड साखर कारखाना सुरू झाल्याबद्दल अभिनंदन, शासन स्तरावरील अडचणी दूर होऊन निसाका सुरू करावा, वीज वितरण कंपनीने सक्तीची वीजबिल वसुली थांबवून शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी हे ठराव झाले.

<div class="paragraphs"><p>Hansraj Wadghule</p></div>
ओबीसी आरक्षण वगळून निवडणुका घेऊ नयेत, ही सरकारची इच्छा!

बैठकीत विविध साखर कारखान्यांकडे थकीत असलेले पेमेंट शेतकरी, कामगार यांना तत्काळ अदा करावे. ‘नाफेड’च्या कांदा खरेदीत अधिकारी, व्यापारी संगनमताने घोटाळा करत असल्याबाबत सीबीआय चौकशी करावी. द्राक्षबागायतदार संघाने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करून त्यांनी ठरवलेल्या द्राक्षमूल्यांची अंमलबजावणी व्हावी. बॅंकांनी शेतकऱ्याला बेकायदेशीर कर्ज दिले असल्यास ती अनैतिक ठरवावी. नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्य असल्याने तेथील वन्यप्राणी अभयारण्य हा फलक तत्काळ काढावा आदी ठराव या वेळी करण्यात आले.

दिग्गजांचा संघटनेत प्रवेश

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मोरे, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब तासकर यांच्यासह अनेकांनी या वेळी शेतकरी संघर्ष संघटनेत प्रवेश केला. श्री. वडघुले यांनी त्यांना संघटनेचा बिल्ला लावत व हातात झेंडा, नियुक्तीपत्र देत सन्मान केला. जिल्हाध्यक्षपदी सुधाकर मोगल, ज्येष्ठ नेते साहेबराव मोरे यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्य, तालुकाध्यक्षपदी भाऊसाहेब तासकर (निफाड) व छकुला आवारे (चांदवड), तसेच निफाड तालुका दिव्यांग आघाडी अध्यक्षपदी कैलास कहांडळ, रवींद्र जाधव (चांदवड) यांची निवड झाली.

राजू देसले, शंकर दरेकर आदींचा सत्कार झाला. प्रदेश कार्याध्यक्ष नाना बच्छाव, जिल्हा सरचिटणीस तानाजी वावधाने, जिल्हा संघटक रतन मटाले, युवक जिल्हाध्यक्ष नितीन कोरडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटोळे, ज्येष्ठ नेते साहेबराव मोरे, राज्य प्रवक्ते नितीन डांगे, भाऊसाहेब तासकर, दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष शरद आहेर, निफाड शहराध्यक्ष सुनील कापसे, शहर कार्याध्यक्ष अनिल वडघुले आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com