Dhananjay Munde
Dhananjay Munde Sarkarnama

‘ईडी’ला बिडी एवढीही किंमत उरलेली नाही!

जळगावला पुन्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनविण्यासाठी एकजूटीने कामाला लागा.

अमळनेर : सध्या राज्याचे सामाजिक सौख्य बिघडवून अशांतता (Law & Order) निर्माण करण्याचा अनेकांचा प्रयत्न सुरू आहे. ‘ईडी’चा (ED) वापर करून थकले म्हणून आताच यांना भोंगा (Loudspeaker) आठवला. मात्र, याच ‘ईडी’ला सध्या बिडी एवढीही किंमत उरलेली नाही, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी केले.

Dhananjay Munde
सहकाऱ्यांना मागे सोडून पुढे पळणारा मुख्यमंत्री नसावा!

इंधवे (ता. पारोळा) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. माजी मंत्री एकनाथ खडसे, डॉ. सतीश पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, माजी खासदार वसंतराव मोरे आदी उपस्थित होते.

Dhananjay Munde
धनंजय मुंडे म्हणाले, मी संघर्षातून खलनायकाचा नायक झालो!

यावेळी मंत्री मुंडे यांनी केंद्र सरकार व वाढत्या महागाईचा चौफेर समाचार घेतला. राज्यातील शांतता व सलोखा बिघडवण्याचे काम काही जातीयवादी शक्ती करीत असल्याचे त्यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनविण्यासाठी सर्वांनी पुन्हा एकदा एकजूट व्हा, तुमची कामे करण्यासाठीच आम्ही मुंबईला बसलेलो आहोत. आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून केवळ अमळनेर मतदारसंघातच नाही तर जळगाव जिल्ह्यात विकासाच्या विविध योजना आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.

या वेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आमदार अनिल पाटील यांच्या कार्याचे तसेच मतदारसंघावरील त्यांची असलेली घट्ट पकड याचेही कौतुक केले. केंद्र शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे राजकीय ओबीसी आरक्षणापासून आज वंचित राहावे लागत असल्याचा हल्लाबोल खडसे यांनी केला. ओबीसी समाज एकत्र आला नाही तर यापुढे शैक्षणिक आरक्षणाला देखील मुकावे लागेल की काय अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

आमदार अनिल पाटील यांनी मनोगतात पारोळा तालुक्यात मात्र अमळनेर मतदारसंघात येणार्या ४२ गावांचा माझ्या आमदारकीच्या विजयात सिंहाचा वाटा आहे. या गावांमध्ये विकासकामांसाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बियाणाच्या प्रश्नाला त्यांनी हात घातला. बियाणे विक्री लवकरात लवकर करावी, जेणेकरून बियाणांचा काळा बाजार होणार नाही व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील, याची काळजी सरकारने घ्यावी असे आवाहन अनिल पाटील यांनी केले. माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील यांनी देखील मेळाव्याला संबोधित केले. सरपंच जितेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. दुपारी एकला मेळाव्याला सुरवात झाली. रणरणत्या उन्हातही मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ, चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख, चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे, जामनेरचे संजय गरुड, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री पाटील, ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील आदी उपस्थित होते. इंधवेचे सरपंच जितेंद्र पाटील, पारोळा पंचायत समितीच्या माजी सभापती छाया पाटील यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com