...आता महाराष्ट्रात `ईडी`चे सरकार आले आहे!

भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच म्हणतात की, राज्यात ईडीचे सरकार आले आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : राज्यातील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांवर सतत खोटे आरोप करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. सरकारमधील मंत्र्यांवर सातत्याने सूडबुद्धीने कारवाया करण्यात आल्या. मात्र आम्ही कधी घाबरलो नाही. ईडीच्या (ED) कारवाईमुळे अनेक लोक भाजपमध्ये (BJP) गेले. आता राज्यात ईडीचे सरकार आले आहे असे प्रतिपादन राज्याची माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. (Chhagan Bhujbal made alligations on BJP`s Political Agenda)

Chhagan Bhujbal
छगन भुजबळांना जुन्या घराची (शिवसेना) ओढ लागली का?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज राष्ट्रवादी भवन येथे श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे,आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार सरोज आहिरे, माजी खासदार देविदास पिंगळे आदी उपस्थित होते.

Chhagan Bhujbal
सत्ता गेली अन् धनंजय मुंडे रमले चहाच्या टपरीवर...

ते म्हणाले, आता महाराष्ट्रात ईडीचे सरकार आले आहे. हे मी नव्हे तरहे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता सरकारने चांगलं काम करावं असे सांगत ईडीचं कार्यालय अडीच वर्षे बंद ठेवावे असा चिमटा त्यांनी काढला.

महाविकास आघाडीने घेतलेल्या जिल्हा नियोजनात मंजूर कामांना सरकारने स्थगिती दिली आहे. सर्वात अगोदर स्थगिती देण्याची घाई नाशिक मध्ये केली. मी कधीही निधी हा स्वतःसाठी मागितला नाही तर सर्व लोकप्रतिनिधींना सम प्रमाणात द्या त्यांच्या मागण्यांनुसार द्या असे आदेश मी दिले होते.

नाशिकच्या विकासात खीळ बसू नये म्हणून कोरोना झाला असतांना देखील मी ऑनलाईन बैठका घेतल्या आणि जनतेची कामे थांबू नये असे आदेश दिले. नाशिक जिल्ह्यातील कामे थांबू नये हा आपला उद्देश होता. मात्र आता कामे थांबल्याने कामे होण्यासाठी वेळ लागणार आहे. मात्र सत्ता बदलली तरी मी आज तुम्हाला ठामपणे सांगतो या जिल्ह्याचा विकास मी कधीही थांबू देणार नाही असे त्यांनी सांगितले.

श्री भुजबळ म्हणाले की, आता आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. ती म्हणजे अधिक अधिक लोक आपल्यासोबत जोडून घेण्याची. सरकार पडताना अनेक आरोप प्रत्यारोप झाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. पण मला त्यांना सांगायचे आहे. की 'बड़ी से बड़ी हस्ती मिट गई हमें मिटाने में, तुम चाहे कितनी भी कोशिश करलो, तुम्हारी उम्र बीत जाएगी हमें झुकाने में' या शायरीद्वारे विरोधकांवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या जोरावर मजबूत झाली आहे.सत्ता असली काय आणि नसली काय. जनतेच प्रेम आमच्यावर नेहमी आहे. हे कधी तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in