..आता पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत नाहीत

जळगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बैठक एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत झाली.
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama

जळगाव : मी पुन्हा येईन, म्हणणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा सत्तेसाठी जीव गुदमरत आहे, मात्र आता पुन्हा ते मुख्यमंत्री (CM) होत नाहीत, असा टोला राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी लगावला आहे.

Eknath Khadse
चिथावणीखोर भाषणामुळे साध्वी सरस्वतीनी अडचणीत येणार?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार हे शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर आहेत. त्याबाबत नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, कैलास पाटील, मनीष जैन आदी उपस्थित होते.

Eknath Khadse
डॉ. शेफाली भुजबळ अन्‌ भाजपच्या देवयानी फरांदेंची फुगडी रंगली!

यावेळी खडसे म्हणाले, गेल्या अडीच वर्षांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकार मजबूतीने काम करीत आहे. त्यामुळे विरोधक सरकारवर आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आघाडीचे नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला हे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण आहे.

ते पुढे म्हणाले, मी देखील विरोधी पक्षनेता होतो. आपण सरकारवर आरोप केले परंतु व्यक्तीगत दुश्‍मनी केली नाही, सध्या विरोधकांचे सत्तेसाठी अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यां‍च्या आंदोलनात भाजपाचे नेते दिशाभूल करीत असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

फडणवीस पुन्हा येणार नाहीच

राज्याचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. खडसे म्हणाले, मी पुन्हा येईलच्या नादात देवेंद्र फडणवीस खालच्या पातळीचे राजकारण करीत आहेत. त्यामुळे जनतेने आता तुम्हाला नाकारले आहे. आता ते पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर म्हणाले, संघटना बळकटीसाठी सर्वांनी कार्य करणे गरजेचे आहे. जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील म्हणाले, पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या कार्याकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे लक्ष आहे, त्याचा ते अहवाल घेत असतात त्यामुळे जे काम करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com