आता काय पुढच्या दिवाळीला शिधा देणार का?

वरणगाव येथे रेशन दुकान परवानाधारकास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी साखर वाटपसंदर्भात जाब विचारला
Shivsena leaaders at Varangaon
Shivsena leaaders at VarangaonSarkarnama

वरणगाव : मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) गाजावाजा करीत `आनंदाचा शिधा` (Diwali ration) देण्याची घोषणा केली. मात्र दिवाळी संपली तरी नागरिकांना शिधा मिळेना. याला जबाबदार कोण?. नागरिक महिला दुकानावर चकरा मारतात व रित्या हाती परततात. आता पुढच्या दिवाळीला शिधा देणार काय? या शद्बांत आक्रमक शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांनी रेशन दुकानदाराला धारेवर धरले. (Shivsena office bearers made inquiry of diwali ration in all fair prise shops in city)

Shivsena leaaders at Varangaon
Aditya Thackrey: दिवाळीच्या रेशन किट पुरवठ्यात मोठा घोटाळा!

यासंदर्भात पुरवठा विभाग व अधिकाऱ्यांनाही जाब विचारला जाईल. तात्काळ पुरवठा सुरळीत न केल्यास राज्य शासनाला स्वस्थपणे काम करू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Shivsena leaaders at Varangaon
टीका करणाऱ्यांना मी नेहमीच कामातून उत्तर देतो

शहरामध्ये शासनमान्य स्वस्त रेशन दुकानामध्ये भाऊबीज झाल्यानंतरही आद्यापपर्यंत किटमधील साखरेचे वाटप झालेले नाही. या बाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी शहरातील सर्व दुकानामध्ये जाऊन साखर अद्यापपर्यंत का मिळत नाही.

याचा जाब संबंधित दुकानदारांना विचारला असता त्यांनी तालुका पुरवठा अधिकाऱ्याकडे बोट दाखविले. पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. या प्रकारामुळे संतप्त शिवसैनिकांनी साखर जोपर्यंत वाटप करणार नाही, तोपर्यंत या महिन्यातील मोफत धान्य वितरण होऊ देणार नसल्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

शासनातर्फे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोरगरिबांना १०० रुपयात किलो चणाडाळ, एक किलो रवा, एक किलो साखर आणि पामतेलचे आनंद शिधा या किटच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार होते. परंतु वरणगाव शहरातील गोरगरीब नागरिकांकडून प्रत्येक दुकादाराने १०० रुपये घेतले. दिवाळी झाली भाऊबीज झाल्यानंतरही अद्यापपर्यंत साखर सोडून सर्व वस्तू दिल्या. मग साखरच का रेशन दुकानदार देत नाही? याबाबत शिवसेनेकडे काही नागरिकांनी ही बाब सांगितली.

यावेळी संतप्त पदाधिकाऱ्यांनी यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले. शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष माळी, अल्पसंख्याक जिल्हा उपसंघटक सईद मुल्लाजी, माजी शहरप्रमुख गुणवंत भोई, शहर समन्वयक माजी ग्रा. प. सदस्य विलास वंजारी, माजी उपशहर प्रमुख सुनील भोई, संघटक प्रल्हाद माळी, सुनील देवघाटोले, विभाग प्रमुख किरण माळी यांनी प्रत्येक रेशन दुकानावर जाऊन अद्यापपर्यंत साखर का मिळत नसल्याचा जाब विचारला.

दुकानदारांनी तालुका पातळीवरूनच साखर आली नसल्याचे सांगितले. या महिन्यातील नागरिकांना रेशन धान्य वितरण करण्याच्या अगोदर साखरचे वाटप झाले पाहिजे. अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करून धान्य वितरण होऊ देणार नसल्याचा इशाराही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रेशन दुकानदारांना दिला आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com