महाराष्ट्राचा यूपी, बिहार झाला की काय? असे वाटायला लागले आहे!

माजी उपमुख्यमंत्री (कै.) नानासाहेब उत्तमराव पाटील स्मृतीदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्राचा यूपी, बिहार झाला की काय? असे वाटायला लागले आहे!
Arunbhai Gujrathi & LeadersSarkarnama

चोपडा : राजकारण कुठे चालले आहे?. आता स्थिती एव्हढी बिघडते आहे की महाराष्ट्राचा यूपी, बिहार होत आहे की काय? असे वाटायला लागले आहे. राजकारणाची बैठक आदर्श असावी, असे मत माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी व्यक्त केले.

Arunbhai Gujrathi & Leaders
निवडणुकीच्या तोंडावर भाजपने रेटला नोकरभरतीचा प्रस्ताव

ते म्हणाले, सत्ताधारी पक्ष बदलला म्हणजे लोक बदलतात, इतर पक्षात सुद्धा चांगली व्यक्ती असतात, असे मानणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे माजी उपमुख्यमंत्री (कै.) उत्तमराव पाटील हे होते. जुन्या काळात राजकारणाची बैठक आदर्श होती. आज त्या पद्धतीचे राजकारण राहिले नाही.

हातेड बुद्रुक (ता. चोपडा) येथे (कै.) लोकनेते उत्तमराव पाटील आदिवासी आश्रमशाळेत माजी उपमुख्यमंत्री (कै.) नानासाहेब उत्तमराव पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

Arunbhai Gujrathi & Leaders
धक्कादायक, भाजपच्या सत्तेत कचऱ्यात दरमहा ९० लाखांचा भ्रष्टाचार!, पैसा जातो कुठे?

या वेळी गुजराथी पुढे म्हणाले, की पक्षाच्या पलीकडे जाऊन प्रेम करणारे लोक असतात. त्यातील नानासाहेब होते. राजकारणातील दुर्मिळ असे व्यक्तिमत्त्व होते. राजकारणातला माणूस कसा असतो, हे पाहायचे असेल, नेता कसा असावा हे पहायचे असेल तर नानासाहेब आदर्श होते. फाटक्या माणसालाही जवळ घेणारा तो आदर्श नेता होता.

या वेळी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील म्हणाले, की राजकारणात जाण्याचा विचार केला तेव्हा मी नानासाहेबांना भेटलो. राजकारणात आपल्या मनाप्रमाणे घडत नाही. त्यामुळे विचार करून राजकारणात ये, असा सल्ला त्यांनी मला दिला. ते राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्त्व होते. या वेळी अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. पद गेल्यानंतर जेव्हा कोणी आपली किंमत करतो, तीच आपली खरी किंमत असते. नानासाहेब परीस होते. त्यांचं आदिवासींवर विशेष प्रेम होते.

व्यासपीठावर माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी केंद्रीय समिती सदस्य घनश्याम अग्रवाल, चोसाकाचे माजी अध्यक्ष ॲड. घनश्याम पाटील, चोसाका अध्यक्ष अतुल ठाकरे, सूतगिरणी उपाध्यक्ष पी. बी. पाटील, माजी सभापती आत्माराम म्हाळके, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव रायसिंग, सीताराम देवराज, चंद्रहास गुजराती, विजया पाटील, सुभाष चौधरी माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सपकाळे, सदस्य गजेंद्र सोनवणे, गोकुळ पाटील, माजी प्राचार्य पी. बी. पवार, सदस्या नीलम पाटील, राजेंद्र पाटील, आश्रमशाळेचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.

...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in