संयमी थोरातही पोलिसांवर संतापले... वारंवार पोलिसांचे अपयश पुढे येत आहे!

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा, सिल्वह ओक प्रकरणी गृह विभागाला घरचाच आहेर
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama

नाशिक : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी गोंधळ म्हणजे राज्यातील पोलिस (Police) यंत्रणेच्या गोपनीय माहिती मिळविण्यासाठी तंत्राचे अपयश आहे, अलीकडे वारंवार हे अपयश पुढे आले आहे. अलीकडे कुठलीही घटना असली म्हणजे आधी मिडियाचे कॅमेरामन पोहोचतात नंतर आमचे पोलिस पोहोचतात अशा शब्दात टीका करीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी गृह विभागाला घरचाच आहेर दिला.

Balasaheb Thorat
राज्यपाल म्हणाले, ‘गोल्डन सेकॅ हॅण्ड’च्या घटना घडू नयेत!

बोलविता धनी शोधावा

श्री पवार यांच्या निवासस्थानी घडलेला प्रकार गंभीर आहे, गोपनीय सुरक्षा यंत्रणेचे हे अपयश आहे. एसटी कर्मचारी समस्यांच्या भावनांशी सहमत आहे. मात्र सरकारच्या काही अडचणी असतात. एसटी कर्मचाऱ्यांचे कायम विलीनीकरण शक्य नव्हतं हे सर्वांनी कायम सांगितले. सहानभूती म्हणून अनेक मदतीचे निर्णय शासनाने घेतले. एका बाजूला न्यायालयाच्या निकालानंतर पेढे वाटले,त्यांनतर कालची घटना घडली हे दुर्दैवी आहे. श्री पवार यांच्या घरापर्यंत जाणे. दगडफेक, चप्पल फेक करणं निषेधार्थ आहे. एसटी चे कर्मचारी स्वतः हुन करणार नाही, ज्यांनी प्रवृत्त केले त्यांना शोधून कारवाई केली पाहिजे, अशी मागणी करीत श्री थोरात यांनी कुठलेही नेतृत्व समजदार असले पाहिजे, दुर्दैवाने कामगारांचे नेतृत्व कोण करत ते त्यांना कळत नाही, कामगारांची दिशाभूल होत आहे. अशी टीका केली.

Balasaheb Thorat
भाजप नगरसेविकेच्या पतीला मारहाण करीत कपडे फाडले!

गुप्तवार्ता विभागाचे अपयश

श्री थोरात यांनी कालच्या घटनेबाबत पोलिस विभागावर टीका केली. पोलिसांच्या गोपनीय विभागाला त्यांना आधीच समजणे आवश्यक होते, आंदोलनावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक होते. कुठल्याही घटनेची माहिती आधी प्रसारमाध्यमांना कळते. मिडियाचे कॅमेरे आधी पोहचतात त्यानंतर आमचे पोलिस, मिडियाची यंत्रणा अधिक चांगली असे म्हणण्याची वेळ आली आहे. या सगळ्याची अधिक गंभीरपणे दखल घ्यावी लागेल असेही स्पष्ट केले.

दखल घेतली; आक्षेपार्ह वक्तव्य नको

नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी महसूल दंडाधिकारी हे आरडीएक्स तर त्याचे अधिकार डिटोनेटर असल्याने त्यांचे अधिकार काढावेत असे पत्र दिले महसूल मंत्री थोरात यांनी पांडे यांच्या विधानावर टीका केली पण त्यानंतर पुन्हा श्री पांडे यांनी महसूल मंत्र्यांची माफी मागतो पण तरीही आपण मतांशी ठाम असल्याचे सांगितले याविषयी आयुक्तांच्या ठाम मतांकडे कसे पाहता या विषयी विचारले श्री थोरात म्हणाले की, पोलिस आयुक्तांनी यंत्रणेतील दोष दाखवायला हरकत नाही त्यांनी चूक दाखवली पाहिजे, आम्ही ती चूक दुरुस्तही केली पाहिजे जो चुकीचे वागतो, त्याला शिक्षाही झाली पाहिजे. पण त्यांचा अनुभव काय त्यांना जे वाटले ते जाहीरपणे बोलले योग्य नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com