राष्ट्रवादीत दोन नव्हे तर पन्नास गट; माझाही एक वेगळा गट : खडसेंचे गुलाबराव पाटलांना प्रत्युतर

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचे म्हटले होते. त्यावरून खडसे यांनी मंत्री पाटील यांना प्रत्युतर दिले आहे.
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (ncp) दोन नव्हे; तर ५० गट आहेत. त्यामध्ये माझाही एक वेगळा गट आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केले आहे. (Not two but fifty group's in NCP; A different group of mine too: Khadse)

एका मुलाखतीत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचे म्हटले होते. त्यावरून खडसे यांनी मंत्री पाटील यांना प्रत्युतर दिले आहे. पक्षात एक गट आणि दोन गट असं काय नसते. पक्ष एकच असतो. एका विचाराचा असतो. वैचारिक मतभेद असू शकतात. पण त्याचा अर्थ पक्षातच वेगवेगळे गट आहेत, असे होत नाही, असेही खडसे यांनी स्पष्ट केले.

Eknath Khadse
मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही अन्‌ लोकसभाही लढणार नाही : फडणवीस

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना खडसे म्हणाले की, राष्ट्रवादीत दोन नव्हे; तर ५० आमदारांचे पन्नास गट आहेत. माझाही एक वेगळा गट आहे. पक्षात गट वगैरे काही नसते. पक्ष हा सर्वांचा एकच असतो. पक्षातील नेत्यांमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात. पण, पक्षात गट आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे.

Eknath Khadse
हरियाणातील नेत्याने आपला पक्ष केला राष्ट्रवादीत विलीन!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआणि काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भेटीवरही एकनाथ खडसे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, राजकारणात भेटीगाठी होतच असतात. फडणवीस यांना मी सुद्धा नाशिकमध्ये भेटलो होतो. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही काही नेते भेटत असतात. तो राजकारणचा एक भाग झालेला आहे. मात्र, त्याचा काही वेगळा अर्थ काढू नये.

Eknath Khadse
काँग्रेस नेते अशोक चव्हाण-देवेंद्र फडणवीसांची भेट; दोघांमध्ये अर्धा तास गुफ्तगू

सुमारे १५ ते २० कोटींची विकासकामे मुक्ताईनगरमध्ये मंजूर आहेत. मात्र, आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्या कामांना स्थगिती मिळविली आहे. कामे मंजूर असूनही निधी मिळालेला नाही, त्यामुळे विकासकामांना खो देण्याचे काम मुक्ताईनगरचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून केले जात आहे, असा आरोपही नाव न घेता खडसे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com