शिवसेना नाही, गिरीश महाजन यांचं राजकारण संपेल!

पालकमंत्री म्हणून नाशिकला काय काय कामगिरी केली, हे सांगण्यास भाग पाडू नका असा इशारा जाधव यांनी दिला.
Deva Jadhav, Shivsena.
Deva Jadhav, Shivsena.Sarkarnama

नाशिक : गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेनेचा (Shivsena) एकही खासदार निवडून येणार नाही, असे विधान केले आहे. शिवसेना हा मराठी माणसाचा श्वास आहे. गुजरातच्या (Gujrat) भल्यासाठी झटणाऱ्यांना महाराष्ट्र (Maharashtra) व मराठी माणसाचे हीत कसे कळणार? शिवसेना संपणार तर नाहीच, मात्र भविष्यात अधिक संख्येने खासदार व शंभर आमदार निवडून येतील, असा दावा शिवसेनेचे महानगर उपप्रमुख देवा जाधव (Deva Jadhav) यांनी सांगितले. (BJP is party whodo not interested in Maharashtra`s welfare)

Deva Jadhav, Shivsena.
दादा भुसे यांनी उद्धव ठाकरेंपुढे अन्नाची शपथ घेतली, अन् गद्दारी केली..

श्री. जाधव यांनी भाजप नेते, माजी मंत्री महाजन यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, भाजप हा गुजरातच्या भल्यासाठी महाराष्ट्राचे नुकसान करणाऱ्यांचा पक्ष झाला आहे. नव्या सरकारने बुलेट ट्रेन, मेट्रो, सहकार निवडणूका यांसह जे निर्णय घेतलेत, त्यातून ते दिसून आले आहे. स्वाभीमानी मराठी माणूस हे कधीच सहन करणार नाही, याची त्यांना जाण नसावी.

Deva Jadhav, Shivsena.
निसर्गाने भरभरून पाऊस दिला...व्यवस्था मात्र कर्मदरिद्री...

ते म्हणाले, भाजपचे नेते गिरीश महाजन सातत्याने शिवसेना संपविण्याची भाषा करीत आहेत. गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होते. त्यांनी येथे काय काय केले, हे जर सांगितले तर त्याचे राजकारण नक्कीच संपे, याची काळजी त्यांनी करावी. शिवसेना हा तळपता सूर्य आहे. किरकोळ ग्रहणांनी तो संपणार नाही, उलट तो आणखी प्रखरतेने तळपेल. शिवसेना संपवण्याची भाषा करणारे संपतील, शिवसेना कधीच संपणार नाही.

श्री. महाजन सातत्याने शिवसेना संपवण्याची भाषा करतात. मात्र शिवसेनेला संपवणारा अजून जन्माला यायचा आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. जेव्हा जेव्हा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा तेव्हा शिवसेना दुपटीने वाढली आहे हा इतिहास आहे.

आज महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या मनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी सदभावना आहे. एव्हढे शांत, संयमी नेतृत्व महाराष्ट्राला लाभले की, ज्यांनी कोरोनाची परिस्थिती उत्तमरित्या हाताळली. महाराष्ट्रद्रोही लोकांना दंगली करण्यापासून थोपवल. शांतपणे कामकाज करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम ठाकरे सरकारने केले आहे. त्यामुळेच जनतेचा शिवसेनेला मोठया प्रमाणावर पाठिंबा मिळतोय.

महाराष्ट्रातील तमाम निष्ठावंत शिवसैनिक तन, मन, धनाने उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. येणाऱ्या काळात शंभरहून जास्त आमदार शिवसेनेचे निवडून येतील. शिवसेनेची विजयी घोडदौड अशीच सुरु राहील.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in