Bhaskar Jadhav; नारायण राणेंना सध्या कोणीही विचारीत नाही

केंद्रातील सरकार सीबीआय, ईडी या संस्थांचा वापर राजकारणासाठी करतेय.
Bhaskar Jadhav & Narayan Rane
Bhaskar Jadhav & Narayan RaneSarkarnama

नाशिक : नारायण राणे (Narayan Rane) यांची सध्याची अवस्था अतिशय गंभीर आहे. त्यांच्याविषयी काहीच बोलायचे नाही असे मी ठरवले आहे. शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackrey) सभेनंतर राणे पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर टीका करतात. मात्र त्यांच्याकडे कुणीच लक्ष देत नाही. त्यांना राज्यात सभेला देखील कोणी बोलवत नाही. अगदी त्यांच्या पक्षातही त्यांचे महत्त्व राहिलेले नाही, अशी टिका शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली. (Shivsena leader Bhaskar Jadhav Criticise Centre Government on Missuse of Indipendent Agencies)

Bhaskar Jadhav & Narayan Rane
Congress; भारत जोडो यात्रेच्या यशात सोशल मीडिया महत्त्वाचा!

ते म्हणाले, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट सीबीआय, ईडी या स्वायत्त वेगवेगळ्या संस्थांचा वापर आज राजकारणासाठी होत आहे. गेल्या साठ- पासष्ठ वर्षात केंद्रीय स्वायत्त संस्थांचा एव्हढा गैरवापर कधीही झाला नव्हता, अशी टिका शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते जाधव यांनी केली.

Bhaskar Jadhav & Narayan Rane
Shocking: एसपी सचिन पाटील, मनसे नेते प्रदीप पवार यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

आमदार जाधव संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमानिमित्ताने नाशिकमध्ये आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील सरकार, भाजप आणि सत्ताधारी पक्षांवर अतिशय तिखट शब्दात टिका केली.

ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात वेदांता, फॉक्सकॉन, टाटा एअर बस यासारखे अनेक कारखाने येऊ घातले होते. ते आता राज्याबाहेर जात आहे. त्याची जबाबदारी राज्य सरकारवर जाते. मात्र ही मंडळा सत्तेत नसलेल्या शिवसेनेवर खापर फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उघडपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलेले आहे. हिम्मत असेल तर एका व्यासपीठावर या आणि हे कारखाने तुमच्या कारकिर्दीमुळे आणि नाकारतापणामुळे गेले की आमच्यामुळे गेले हे एकदा संपूर्ण महाराष्ट्राला कळू द्या.

कर्नाटक संदर्भातील प्रश्न असतील भाजपचे सरकार कर्नाटकात केंद्रात आहे. म्हणून त्या ठिकाणावरील मराठी माणसावर वाढलेला अत्याचार यावर शिवसेना राज्य सरकारला जाब विचारेल. सत्ताधाऱ्यांकडून वारंवार खोटे बोलून महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली जात आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहेत. अशा वेळी स्वतःला महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून मिरवणारे महाराष्ट्राच्या ताटातला घास जाणीवपूर्वक काढून घेत असल्याचे त्यांना लक्षात कसे येत नाही, असा प्रश्न त्यांनी केला.

स्वायत्त संस्थांबाबत सगळ्याच ठिकाणी संशय व्यक्त केला जात आहे. निवडणूक आयुक्तांबाबत अनेक तास चर्चा झाली. त्यांच्याबद्दलचा हा विषय सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होता. तो आदेश बाजूला सारला गेला. बारा तासांत त्यांच्या नियुक्तीची फाईल क्लिअर करण्यात आली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने देखील आश्चर्य व्यक्त केले. या स्वायत्त संस्था कोणाच्यातरी विचारानुसार, राजकीय मर्जीनुसार काम करतात की काय अशी शंका निर्माण होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com