बिनविरोध नकोच, मते मिळवून जिंकण्यातील आनंद बिनविरोध निवडणुकीत नाही!
Amrishbhai PatelSarkarnama

बिनविरोध नकोच, मते मिळवून जिंकण्यातील आनंद बिनविरोध निवडणुकीत नाही!

धुळे विधान परिषदेसाठी सहा उमेदवारांचे अर्ज दाखल.

धुळे : मी निवडणूक लढणारा माणूस आहे, त्यामुळे मतदारांची मते घेऊनच मला निवडून यायचे आहे. निवडून येण्यात जो आनंद आहे, तो कशातच नाही. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मी बिनविरोधसाठी प्रयत्नही करणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेत या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार अमरिशभाई पटेल (Amrishbhai Patel) यांनी व्यक्त केली.

Amrishbhai Patel
बच्चू कडू संतापले, `अरे, तुम्ही तर मंत्री जयंत पाटील यांच्या पत्रालाही दाद देत नाही`

ते म्हणाले, मी गेली अनेक वर्षे सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. या वाटचालीत नागरिक व कार्यकर्त्यांनी मला भरभरून पाठींबा दिला आहे. सामान्यांचे प्रश्न सोडविण्याला माझे प्राधान्य असते. मी केलेली कामे जनतेपुढे आहेत. या निवडणुकीआधीच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध मतदारांनी संपर्क करून तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्याला पाठींबा व्यक्त केला आहे. हा लोकसंपर्कच आपल्याला विजयी करील. पक्षाने माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला, त्यासाठी मी आभारी आहे.

Amrishbhai Patel
आगामी महापालिका निवडणुक भाजप विकासाच्या मुद्दयावरच लढणार!

धुळे- नंदुरबार विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी श्री. पटेल यांच्यासह प्रक्रियेअंती सहा उमेदवारांचे ११ अर्ज दाखल झाले.महाविकास आघाडीतर्फे गौरव वाणी यांनी अर्ज दाखल केला. यावेळी ते बोलत होते. भाजपकडून श्री. पटेल यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर झाली होती.

श्री. पटेल शिक्षणासह सहकार, सिंचन आदी विविध क्षेत्रांत तज्ज्ञ आहेत.

यावेळी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी, पटेल म्हणजे सर्वपक्षीयांना मान्य नेतृत्व असल्याचे नमूद केले. खासदार डॉ. गावित, डॉ. भामरे, कर्पे, रंधे, भाजप जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनीही पटेल यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. पटेल यांनी विकास हाच आपला अजेंडा असल्याचे सांगून दोन्ही जिल्ह्यात एकदिलाने काम करून जनसेवा करणार असल्याचे सांगितले. प्रभाकर चव्हाण यांनी आभार मानले.

छाननी, माघारी अशी

उमेदवारी अर्जांची उद्या (ता.२४) छाननी होईल. २६ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत असेल तर १० डिसेंबरला सकाळी आठ ते दुपारी चारदरम्यान मतदान होईल.

---

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in