Amit Thackarey; ‘मनसे’ची होणार नव्याने बांधणी!

नाशिकमध्ये अमित ठाकरे यांचे नवे राजकीय संकेत; संवाद यात्रेवर देणार भर
Amit Thackarey
Amit ThackareySarkarnama

नाशिक : (Nashik) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (MNS) चैतन्य निर्माण करण्यासाठी नव्याने संघटनात्मक बांधणीचे संकेत देतानाच मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackarey) यांनी संघटनात्मक बैठकीचा अहवाल तत्काळ पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackarey) यांना सादर केला जाणार असून, मनसेच्या सत्ताकाळात सामाजिक दायित्वातून तयार झालेल्या प्रकल्पांपैकी बोटोनिकल गार्डन प्रकल्प सुरु करणार असल्याचे सांगितले. (MNS will reorganise office bearers pattern)

Amit Thackarey
Nashik News; घोषणा फोल, एक कांदा देखील सरकारने विकत घेतलेला नाही!

मनसेच्या संघटनात्मक बांधणीचा भाग म्हणून अमित ठाकरे मंगळवारी नाशिकमध्ये होते. पक्षाच्या राजगड कार्यालयात प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार ईचम, महिला आघाडीच्या सुजाता डेरे, जिल्हा प्रमुख अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, ज्येष्ठ नेते सलीम शेख, पराग शिंत्रे आदींनी त्यांचे स्वागत केले.

श्री. ठाकरे यांनी दिवसभरात प्रभागनिहाय संघटनेचा आढावा घेतला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अडचणी, आगामी राजकीय गणिते, प्रभागाची सध्याची स्थिती, विकासकामांचा आढावा त्यांनी घेतला.

Amit Thackarey
BJP News; भाजप म्हणते महापालिका प्रशासक ‘जबाब दो’

त्यानंतर सायंकाळी प्रसार माध्यमांशी औपचारीक संवाद साधला. कार्यकर्त्यांशी संवाद वाढविण्यासाठी राज्यभर दौरे करत असल्याचे सांगून त्यांनी, त्याचाचं एक भाग म्हणून नाशिकमध्ये बैठक घेतल्याचे स्पष्ट केले. बैठकींचा अहवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सादर केला जाणार आहे.

गरज भासल्यास संघटनात्मक बदलाचे संकेतही ठाकरे यांनी दिले. दरम्यान, पक्षप्रमुख राज ठाकरे लवकरच नाशिकच्या दौऱ्यावर येणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

Amit Thackarey
ZP News; विजयकुमार गावित यांचा कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांना दणका!

बॉटीनिकल गार्डन सुरु होणार

महापालिकेत मनसेची सत्ता असताना टाटा ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक दायित्वाच्या निधीतून बोटोनिकल गार्डन साकारले. या गार्डनमध्ये बोलकी झाडे लावण्यात आली. प्रकल्पाचे उद्‌घाटन टाटा समुहाचे रतन टाटा यांच्या हस्ते झाल्यानंतर काही काळ गार्डन सुरु राहीले.

मनसेची सत्ता गेल्यानंतर बोटोनिकल गार्डन दुर्लक्षित झाले. अद्यापही तीच अवस्था आहे. नाशिककरांच्या मनोरंजनासाठी साकारलेला हा प्रकल्प पुन्हा सुरु करण्यासाठी वनविभाग, महापालिका अधिकाऱ्यांशी आजच बोलणी झाली असून, त्यांनी लवकरच बोटोनिकल गार्डन सुरु करण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती ठाकरे यांनी या वेळी दिली.

Amit Thackarey
AAP News : 'आप'च्या सिसोदिया, जैन यांनी या कारणांसाठी दिला राजीनामा

मनसेची घे भरारी

महापालिकेत मनसेची सत्ता आली त्यापुर्वी कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. तेच वातावरण पुन्हा निर्माण करण्यासाठी व्युहरचना आखली जाणार आहे. अमित ठाकरे यांचा रोड शो, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद यानिमिताने होतील. त्याचबरोबर मनसेच्या सत्ता काळातील सुरु झालेले, परंतू सध्या दुरवस्था झालेल्या प्रकल्पांना उर्जितावस्था प्राप्त करून दिली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com