महापालिकेत कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा

एकनाथ शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली महापालिका आयुक्तांची भेट.
Eknath Shinde group`s leaders at NMC
Eknath Shinde group`s leaders at NMCSarkarnama

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अखत्यारीत असलेल्या नगरविकास विभागाने (Urban development) तीन केडरचा आकृतीबंध (Pattern) मंजूर केला आहे. त्यामुळे मेडिकल, पॅरा मेडिकल आणि अग्निशमन विभागात भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यातून ६०० लोकांना रोजगार मिळेल. (Employment) ही भरती प्रकिया लवकर राबवावी अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने केली. (Eknath shinde group delegation meet NMC commissioner)

Eknath Shinde group`s leaders at NMC
`समृद्धी`च्या दर्जाहीन कामात कोणाकोणाचे खिशे गरम झाले

शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय माशीलकर, खा. हेमंत गोडसे, नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख जयंत साठे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची भेट घेऊन चर्चा केली.

Eknath Shinde group`s leaders at NMC
आता काय पुढच्या दिवाळीला शिधा देणार का?

शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात पक्षाचे सचिव माशीलकर, खासदार गोडसे, नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख जयंत साठे यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रश्नांवर चर्चा झाली.

शिष्टमंडळाने मनपा आयुक्त आणि पोलिस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याशी झालेल्या चर्चेत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या आराखड्याबाबत चर्चा करण्यात आली. कुंभमेळ्याच्या नियोजनसाठी राज्यस्तरीय समिती तयार होण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करू असे आश्वासन माशीलकर यांनी दिले.

शहराच्या दृष्टीने महत्वाचे नवे रिंगरोड अधिक रुंदीचे असावे, अशी सूचना खा. हेमंत गोडसे यांनी केली. शहरातील महापालिकेचे सभागृह विविध संस्था ताब्यात घेऊन देखभाल करण्यास तयार असल्याने त्यांना रेडिरेकनरने भाडे आकरण्याऐवजी सवलत द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. त्याला मनपा आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बिटको आणि झाकीर हुसेन रुग्णालयातील एमआरआय मशीन लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे आयुक्तांनी संगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असलेल्या नगरविकास विभागाने तीन केडरचा आकृतीबंध मंजूर केल्याने लवकरच मेडिकल, पॅरा मेडिकल आणि अग्निशमन विभागात भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. ही भरती प्रकिया लवकर राबविण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. त्यामुळे, ६०० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.

पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याशी झालेल्या भेटीत अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून चुंचाळे, अंबड औद्योगिक वसाहतीचे स्वतंत्र पोलिस ठाण्याचा प्रस्ताव, श्रमिकनगर भागातील अवजड वाहतूक, कंटेनर, अपघातग्रस्त रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट, गुन्हेगारी अश्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

या शिष्टमंडळात नाशिक लोकसभा सहसंपर्क प्रमुख काशीनाथ मेंगाळ, ग्रामीण जिल्हा प्रमुख अनिल ढीकले, भाऊलाल तांबडे, महिला आघाडी जिल्हा संघटक लक्ष्मीताई ताठे, मंगला भास्कर, महानगरप्रमुख प्रविण तिदमे, महिला आघाडी महानगरप्रमुख अस्मिता देशमाने, युवासेना जिल्हा प्रमुख योगेश मस्के, सदानंद नवले, अॅड. श्रद्धा जोशी कुलकर्णी, प्रविण काकड, कोमल साळवे, अॅड. अक्षय कलंत्री आणि पदाधिकारी होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in