आम्हाला महापालिका निवडणूक महत्वाची...एकनाथ शिंदे नाही!

नाशिकचे शिवसैनिक म्हणतात, निवडणूक तयारी सोडून शिंदे मागे कोण जाणार?
Nashik Latest Marathi News, Eknath Shinde News
Nashik Latest Marathi News, Eknath Shinde NewsSarkarnama

नाशिक : शहर- जिल्ह्यात (Nashik) महापालिका (NMC) आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची धामधूम आहे. प्रभाग आणि गट गणात शिवसेनेच्या (Shivsena) इच्छुकांना त्यांच्या राजकीय करिअरची चिंता आहे. अशा स्थितीत शिंदे सोबत जाऊन काय हशील? आमचे राजकीय भवितव्य डावावर लावून फुटणार कोण? असा शिवसेनेतील इच्छुक व कार्यकर्त्यांमधून एकमेकांच्या संवादात प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Nashik workers are concentrated on NMC election)

Nashik Latest Marathi News, Eknath Shinde News
शिंदे असो वा राणे, प्रत्येक बंडात नाशिक केंद्रस्थानी!

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्याने भलेही राज्यातील सत्ताकारणावर परिणाम झाला असला तरी, नाशिक शहर जिल्ह्यात मात्र फारसा परिणाम होणार नाही. शहर परिसरात तर काहीच परिणाम दिसत नाही. किंबहुना तसा तो दिसणारही नाही. असाच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. (Nashik Latest Marathi News)

Nashik Latest Marathi News, Eknath Shinde News
उद्धव ठाकरेंसोबत फोटो काढून आमदार मंजुळा गावित गुवाहाटीत गेल्या.

नाशिकला शिवसेनेचे मोठे संघटन आहे. शहर जिल्ह्यातील दोन पिढ्या शिवसेनेत वाढल्या आहेत. मुंबई सोबत नाशिकच्या भगूरला शिवसेनेची शाखा सुरू झाली एवढा जुना इतिहास आहे. मुंबईनंतर नाशिक शिवसेनेच्या केंद्रस्थानी राहिले आहे. अशा बंडातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची आर्थिक सोय होते. त्यांचे राजकीय भवितव्याचा फैसला होतो. सामान्य कार्यकर्त्याच्या हाती काही लागत नाही. हाच आत्तापर्यंतचा अनुभव असल्याने बंडाचा परिणाम होणार नसल्याचे शिवसेनेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

भुजबळांपासून श्रीगणेशा

नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना बंडाळीचा अनुभव नवा नाही. किंबहुना सर्वप्रथम पहिल्या वाहिल्या बंडाचा फटका नाशिकला बसला. सध्याचे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बंड केले तेव्हा शहरातील पदाधिकारी शिवसेनेतून फुटले. तत्कालीन एक आमदार त्यांच्यासोबत असल्याच्या चर्चा होत्या. त्यांच्या विरोधात रेल्वे स्थानकावर बंडाळी विरोधात शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली. आक्रोश

एवढा मोठा होता की, श्री भुजबळ यांच्या सोबत जाऊ इच्छिणाऱ्या कुंपणावरील अनेकजण शिवसेनेत राहिले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com