अनिल पाटील नितीन गडकरींना भेटले अन् प्रश्न सोडवूनच परतले!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आमदार अनिल पाटील यांना आश्वासन
Nitin Gadkari & Anil Patil
Nitin Gadkari & Anil PatilSarkarnama

अमळनेर : येथील चोपडा (Chopada) रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाचे (Railway Flyover) काम पूर्णत्वास येऊन हा पूल लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असताना लवकरच या उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते व्हर्चुअल पद्धतीने होणार असल्याची माहिती आमदार अनिल पाटील (Anil Patil) यांनी दिली आहे.

Nitin Gadkari & Anil Patil
कोर्ट `विक्रांत` सारख्या प्रश्नावर दिलासा देत असेल तर जनतेचा उद्रेक होईल!

याबाबत आमदार अनिल पाटील हे नुकतेच दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी पाडळसरे धरणाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी अमळनेर येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास आल्याने या पुलाचे लोकार्पण करण्यासाठी तारिख मिळावी, अशी विनंती केली होती.

Nitin Gadkari & Anil Patil
नीलिमा पवार यांनी `मविप्र` संस्‍थेला उच्च पातळीवर नेले!

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी देखील आमदार अनिल पाटील यांच्या वतीने उड्डाणपुलाचे लवकर लोकार्पण करावे, अशी विनंती केंद्रीय मंत्री गडकरी यांना केली होती. त्यामुळे गडकरी यांनी लवकरच तारीख कळविली जाईल, असे आश्वासन आमदारांना दिले होते. दरम्यान, मंत्री गडकरी यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

जळगाव येथून विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण व्हर्च्युअल पद्धतीने करणार आहेत. त्यात अमळनेर येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण देखील समाविष्ट केले असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांना केंद्रीय स्तरावरून कळविण्यात आली आहे. येत्या एक, दोन दिवसात अधिकृत तारीख आपल्याला प्राप्त होणार असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, आमदार अनिल पाटील यांचे अनेक वर्षांपासून केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी विशेष पारिवारिक संबंध असून, या संबंधामुळे केंद्रीय स्तरावरील अनिल पाटील यांचे कोणतेही काम असो गडकरी यांची विशेष मदत त्यांना होत असते. पाडळसरे धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश करण्यासाठी देखील मंत्री गडकरी आमदारांना सहकार्य करीत असून, आता उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचीही ग्वाही दिल्याने राजकारणात पक्षविरहीतही अनेक चांगल्या गोष्टी घडतात, हेच यातून स्पष्ट झाले आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com