स्टीलच्या दरवाढीवर नितीन गडकरींचा स्टील फायबरचा पर्याय!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत पंधरा दिवसांनी आदेश काढण्याचे सांगितले.
स्टीलच्या दरवाढीवर नितीन गडकरींचा स्टील फायबरचा पर्याय!
Nitin Gadkari With Steel FibreSarkarnama

धुळे : ‘‘देशात स्टीलच्या (Steel) किमती वाढल्याने बांधकाम क्षेत्रावर परिणाम होत आहे. त्यावर स्टील फायबरचा (Steel fibre) नवपर्याय शोधला असून तो देशात लागू होण्यासाठी पंधरा दिवसांत आदेश देणार आहे. स्टील फायबर चाळीस टक्क्यांनी स्वस्त आहे. त्यामुळे पूल, रस्ते (Roads) कामात आता स्टीलच्या वापराची गरज राहणार नाही,’’ अशी माहिती केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी येथे दिली.

Nitin Gadkari With Steel Fibre
सूर्य- चंद्र, तारे राहतील तोवर नितीन गडकरींचे नाव लक्षात राहील!

खानदेशातील चार हजार कोटींवर निधीतील विविध विकास प्रकल्पांच्या उद्‌घाटन, लोकार्पण, कार्यारंभासाठी मंत्री गडकरी आज दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते २३ तरुणांचे स्टार्ट- अप प्रदर्शन आणि उद्योग प्रबोधिनीचे उद्‌घाटन झाले. समाजात उद्यमशीलता वाढीची गरज व्यक्त करत गडकरी यांनी शेतकरी हा तंत्रज्ञानाच्या प्रवाहात येऊन उर्जादाता झाला पाहिजे, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.

Nitin Gadkari With Steel Fibre
संजय राऊतांनी आम्हाला रामभक्ती शिकवू नये!

फ्लेक्स इंजिनवर आधारित वाहनांचा स्वीकारला जाणारा ट्रेंड, सांडपाण्यावर प्रक्रिया व शुद्धीकरण आणि त्याचे विविध उपयोग या विषयांचा आढावा घेताना गडकरी यांनी तरुणांना नवतंत्रज्ञानातील बदल स्वीकारत नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे व्हा, असे आवाहन तरुणांना केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.