नितेश राणे म्हणातात, संजय राऊत हा `लोमटया` आहे

मुख्यमंत्र्यांना विश्वास आपल्या आमदारांवर विश्वास नसल्यानेच त्यांची कोंबाकोंबी केली जात आहे.
नितेश राणे म्हणातात, संजय राऊत हा `लोमटया` आहे
Nitesh RaneSarkarnama

नाशिक : शिवसेनेने (Shivsena) राज्यसभा निवडणुकीत सेफ मते संजय पवार (Sanjay Pawar) यांना दिली पाहिजेत. कारण ते खरे शिवसैनिक आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) हा तर लोमटया आहे. त्याला जादा मते दिली पाहिजेत. तो बाहेरून आलेला आहे. त्याच्यासाठी मुख्यमंत्री (Uddhav Thakrey) एव्हढी धावपळ का करीत आहेत?. असे शब्दप्रयोग करूत आज भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) शिवसेनेवर घसरले. (Nitesh rane criticised shivsena on rajyasabha Election)

Nitesh Rane
नाशिकमध्ये कंपनी गेटवरच उद्योजक नंदकुमार आहेर यांचा खून!

आमदार राणे यांच्या उपस्थितीत आज धार्मिक प्रतिकांची समाज माध्यमांवर विटंबणा झाल्याने छोटा मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे सहभागी झाले.

Nitesh Rane
हक्काचा माणूस म्हणून मला हाक द्या!

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. राणे यांनी कोणत्याही धार्मिक प्रतिकांची तसेच धर्माविषयी अपमानजनक कृत्य घडता कामा नये. असे करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. यासंदर्भात नाशिक येथे इन्स्टाग्रामवर प्रसारीत झालेल्या एका आपत्तीजनक चित्राबाबत देखील कडक कारवाई करून संबंधीताना अटक करावी, ही आमची मागणी आहे, असे सांगितले.

यावेळी त्यांनी शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री म्हणतात, आमचेच हिदुत्व खरे आहे. मग ते कोणत्याही विषयावर भूमिका का घेत नाहीत. ग्यानवापी मशिद, औरंगाबाद शहराचे नामांतर, औरंगजेब यांची कबर या विषयावर त्यांची भूमिका काय आहे, हे त्यांनी जाहीर करावे. शिवसेना कधीही कोणत्याही विषयावर भूमिका घेत नाही. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही.

राज्यसभा निवडणुकीबाबत ते म्हणाले, भाजपचे आमदार निर्धास्त आहेत. मात्र शिवसेनेत काही आलबेल नाही. भास्करराव जाधव तरी शिवसेनेच्या उमेदवाराला मत देतील काय?. हे सांगता येत नाही. त्यामुळे कोणता संजय निवडून येईल, राऊत की पवार हे कळत नाही. शिवसेनेने आपली सेफ मते संजय पवारला दिली पाहिजे कारण, संजय पवार हा खरा शिवसैनिक आहे. संजय राऊत हा तर `लोमटया`आहे. बाहेरून आलेला आहे. त्यांनी लोकप्रभा साप्ताहिकात बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांच्या पत्नीशी पटत नाही, असा लेख लिहिला होता. त्याला मदानासाठी शिवसेना आमदारांवर दबाव का टाकता?. असा प्रश्न त्यांनी केला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in