PFI News: ‘पीएफआय’च्या अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीनवर साखरझोपेतच झडप

जालन्यातील संशयिताच्या `एनआयए-एटीएस`ने जळगावमधून आवळल्या मुसक्या.
Abdull Raouf Momin
Abdull Raouf MominSarkarnama

जळगाव : एनआयई (NIA) पथकाने येथे संशयित अब्दुल हादी अब्दुल रौफ (Abdull Hadi Abdull Raouf) याला अटक केली. तो मूळ नेर (जालना) येथील रहिवासी आहे. तो संघटनेच्या जालन्यातील सोशल मीडियाचे काम पाहतो. मात्र, तो जळगावात (Jalgaon) कसा आला याबाबत अद्याप कुठलीच ठोस माहिती उपलब्ध नाही. पहाटे धार्मिक स्थळ उघडण्याच्या वेळीच तो अलगद येऊन झोपला असावा असा अंदाज आहे. प्रार्थनास्थळावरील विश्वस्तांनाही याबाबत फारशी माहिती नसल्याचे आढळून आले. (NIA & ATS valve PFI treasurer and arrest in Jalgaon)

Abdull Raouf Momin
आमदार सांगतात, `कुठून अवदसा आठवली, या नादाला लागलो`

राष्ट्रीय तपास यंत्रणा व दहशतवादविरोधी पथकाच्या देशभरातील संयुक्त कारवाईत विविध ठिकाणी छापेमारी केली. जळगाव शहरात भल्या पहाटे अधिकाऱ्यांनी मेहरूणमधून एकाला ताब्यात घेतले. संशयित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा खजिनदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Abdull Raouf Momin
Shivsena: शिंदे सेनेच्या बंटी तिदमेंचा शिवसेनेने चोख बंदोबस्त केला!

गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास या संशयिताला ताब्यात घेत अवघ्या तासाभरात तपासयंत्रणेचे अधिकारी पथक आले, त्या वेगाने रवाना झाले. अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन (वय ३२, रा. रेहमान गंज वरुण अपार्टमेंट, जालना) असे संशयिताचे नाव आहे.

दहशतवादविरोधी पथकाच्या अकोला युनिटचे उपनिरीक्षक गौरव सराग, अनिल देवरनकर, सचिन चव्हाण, योगेश सतरकर आदींचे पथक तीन वाहनांनी पहाटे तीनला जळगावात दाखल झाले. एमआयडीसी पोलिस ठाण्याची मदत घेत पहाटे साडेतीनला मेहरूणमधील दत्तनगरातील धार्मिकस्थळावर धडकले. गाढ झोपेत असलेल्या तिघांना पथकाने ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. तिघांची चौकशी झाल्यानंतर पैकी दोघांना सोडून देण्यात आले. अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन याला अटक केल्याचे स्थानिक पोलिसांनी माहिती देताना सांगितले.

पथक औरंगाबादच्या दिशेने

ताब्यात घेतलेली व्यक्ती जालना येथील मूळ रहिवासी असून, तो काही दिवसांपासून जळगावच्या मेहरूण परिसरात वास्तव्यास होता, अशी माहिती मिळाली. अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन असे त्याचे नाव असून, त्याच्याविरुद्ध मुंबई गु.र.नं. २१/२०२२ कलम १२१-A, १५३-A, १२०-ब, १०९ भा.दं.वि. सहकलम १३ (१) (ब) UAP ACT प्रमाणे गुन्हा दाखल आहे. एवढेच नव्हे तर ही व्यक्ती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. अटकेतील संशयिताला घेऊन अकोला एटीएसचे पथक औरंगाबादच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

एटीएस महाराष्ट्रचे मोठ्या प्रमाणात छापे

पहाटेच्या कारवाईत एटीएस महाराष्ट्रने औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई येथे मोठ्या प्रमाणात छापे टाकले. मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड येथे विविध कलमांतर्गत आणि यूएपीए कलम १३ (१) (ब)मध्ये समाजात वैर वाढविणाऱ्या बेकायदा कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in