Narhari Zirwal : नरहरी झिरवाळांची शिवसेनेशी चर्चा आणि `नॅाट रिचेबल`च्या अफवा!

झिरवळांनी केली खासदार अरविंद सावंत व शिवसेनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा.
Narhari Zirwal News in Marathi, Shivsena Political Crisis
Narhari Zirwal News in Marathi, Shivsena Political CrisisSarkarnama

मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी केली. या बंडखोरांवरील कारवाईच्या तयारीने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) चर्चेचे केंद्र आहेत. मात्र आज ते नॅाट रिचेबल असल्याच्या अफवा पसरल्या. प्रत्यक्षात ते विधीमंडळाच्या कार्यालयात होते.(Mp Arvind Sawant meet Narhari Zirwal in Assembly office)

Narhari Zirwal News in Marathi, Shivsena Political Crisis
एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट अपात्र कसा ठरणार?, ते प्रणिती शिंदेंनी स्पष्टपणे सांगितले!

दरम्यान `सरकारनामा` प्रतिनिधींने देखील श्री. झिरवाळ तसेच त्यांच्या मुंबईतील स्वीय सहाय्यकांशी संपर्क केला. श्री झिरवाळ विधीमंडळाच्या आपल्या कार्यालयातच होते. त्यांनी खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी चर्चा केली, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली. (Narhari Zirwal News in Marathi)

Narhari Zirwal News in Marathi, Shivsena Political Crisis
किती आले, किती संपले, शिवसेना आहे तिथेच आहे!

एकनाथ शिंदे यांसह बारा आमदारांनी नवा गट स्थापनेबाबत राज्यपालांना पत्र दिले आहे. शिवसेनेच्या बंडखोरांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटातून त्यावर विविध पर्याय शोधले जात आहे. बंडखोरांना चुचकारले जात आहे.

आता आज सकाळी खासदार संजय राऊत यांसह नेत्यांनी विधानसभा उपाध्यक्षांना सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या बारा आमदारांवर कारवाईचे पत्र दिले आहे. त्यामुळे या राजकीय घडामोडींचे केंद्र विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ आहेत. मात्र काही माध्यमांनी ते नॅाट रिचेबल असल्याच्या बातम्या केल्या.(Shivsena Political Crisis)

दरम्यान बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या बाजुने भाजप व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते देखील सक्रीय झाले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सरकार वाचविण्यासाठी विविध नेत्यांशी चर्चा करून भूमिका ठरवली आहे. त्यांनी याबाबत काय करायचे याचे विविध पर्याय देखील विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in