Dada Bhuse News; दादा भुसेंच्या मतदारसंघात शिवसेनेने लावले फटाके!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अद्वय हिरे व समर्थकांनी प्रवेश केला.
Adway Hire & Dada Bhuse
Adway Hire & Dada BhuseSarkarnama

मालेगाव : (Malegaon) येथील युवानेते अद्वय हिरे (Adway Hire) यांनी भाजपावर (BJP) जोरदार टिका करत शिवबंधन (Shivsena) बांधले. हिरे यांची ही राजकीय चाल दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या मतदारसंघातच त्यांच्या अडचणी वाढवणार आहे. नाशिक महापालिका (NMC) जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पालकमंत्री भुसे यांच्या स्वतःच्या मतदारसंघातच शिवसेनेने चांगलेच फटाके लावल्याने त्यांची झोप उडण्याची शक्यता आहे. (Shivsena take a new political game in Malegaon Politics)

Adway Hire & Dada Bhuse
Crime News : राजकीय पक्षाची पदाधिकारी असल्याचे भासवत खंडणी मागणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात

मुंबईत शिवसेना भवनयेथे शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात त्यांनी समर्थकांसह प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्री. हिरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे स्वागत केले. यावेळी खासदार संजय राऊत, विनायक राऊत, जयंत दिंडे, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर आदी उपस्थित होते.

Adway Hire & Dada Bhuse
Mahadev Jankar : ...तर मी डॉक्टर झालो असतो; महादेव जानकरांनी सांगितला किस्सा अन् उपस्थित झाले अचंबित

श्री. ठाकरे यांनी यावेळी नाव न घेता दादा भुसे यांच्यासह पक्ष सोडून गेलेल्या आमदारांवर टिका केली. तसेच बर झाल गद्दार गेले आणि त्यांच्यामुळे आम्हाला हिरे सापडले असेही म्हणाले. हिरे आणि ठाकरे कुटुंबाचे संयुक्त महाराष्ट्राच्या जडण घडणीपासून ऋणबंध आहेत.

कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे योगदान कायम समरणात आहे आणि राहील. हिंदू हृदयसम्राट, शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करत भाजपने पाठीत खंजीर खुपसला. अद्वय हिरे हे आपले युवा नेते असून त्यांच्यावर उत्तर महाराष्ट्रची जबाबदारी आली आहे. त्यांना संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. मी पुढच्या महिन्यात मालेगावला येऊन जाहीर सभा घेऊन खुलेपणाने बोलेल असे त्यांनी सांगितले.

या वेळी युवा नेते श्री. हिरे यांनी भाजपासह पक्षांतर बाबत आपली भूमिका स्पष्ट करून सोशल मीडियावरही पोस्टसंबंधी सविस्तर खुलासा केला. शेतकरी विरोधी सरकार गाडून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार आणण्याचे अभिवचन त्यांनी दिले.

जुने शिवसेना पदाधिकारी रामा मिस्तरी, कैलास तिसगे, राजाराम जाधव, नथू जगताप, अजय जगताप, विलास बिरारी यांच्यासह लकी खैरनार, पवन ठाकरे, काशिनाथ पवार आदींसह शेकडो हिरे समर्थक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com