दीपक पांडेंच्या आदेशाला नव्या आयुक्तांकडून केराची टोपली

आता खुशऽऽऽल वाजवा भोंगे, परवानगीची सक्ती संपली
दीपक पांडेंच्या आदेशाला नव्या आयुक्तांकडून केराची टोपली
Jayant NaiknavreSarkarnama

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) राज ठाकरे (Raj Thakre) यांच्या मशिदीवरील भोंग्यांच्या अल्टीमेटमला आयुक्त दीपक पांडे (Deepak Pande) यांनी चाप लावला होता. धार्मिक स्थळांवरील भोंगे लावण्यासाठी परवानगीची सक्ती करण्याबरोबरच आवाजाची क्षमता तपासण्याच्या सुचना दिल्या होत्या. तसेच मशिदीच्या शंभर मीटर परिसरात नमाजपूर्वी व नंतर पंधरा मिनीटे हनुमान चालीसा म्हणता येणार नाही असे आदेश काढल्याने दीपक पांडे चर्चेचा विषय ठरले होते. मात्र नवे आयुक्त जयंत नाईकनवरे (Jayant Naiknavare) यांनी अवघ्या पाच दिवसातच केराची टोपली दाखवली आहे.

Jayant Naiknavre
राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांचा अल्टीमेटम मागे घेतील?

यासंदर्भात आज सकाळी नाईकनवरे यांनी हा आदेश काढला. त्यात यापूर्वीचा १७ एप्रिलचा आदेश रद्द करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र या आदेशाचा नेमका अर्थ व परिणाम काय याबाबत त्यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या विषयावर प्रतिक्रीया देण्यास नकार दिला. मी आदेश काढला आहे, या पलिकडे त्यांनी बोलण्यास नकार दिला.

Jayant Naiknavre
बदली झालेले आयुक्त दीपक पांडे म्हणाले, `मी बेहद्द खुष`

यापूर्वी दीपक पांडे यांनी आदेश काढून मशिक, मंदीर, चर्च, गुरुद्वारा यांसह सर्वच धार्मिक स्थळांवरील भोंग्यांना आवाजाची मर्यादा निश्चित केली होती. त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेतला होता. त्यानुसार विविध झोन नुसार दिवसा व रात्री भोंग्यांचा आवाज किती असेल हे निश्चित केले होते. याशिवाय धार्मिक स्थळांवर भोंगे लावायचे असल्यास त्यासाठी पोलिस आयुक्तांची परवानगी सक्तीची केली होती. याबाबत सर्व पोलिस ठाण्यांना सुचना देण्यात आल्य. त्यामुळे पोलिसांनी आपल्या ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील धार्मिक स्थळांच्या प्रमुखांना बोलावून परवानगीची प्रक्रीया सुरु केली होती. भद्रकाली पोलिस ठाण्यात एका मशिदीच्या विश्वस्तांनी परवानगीसाठी अर्ज देखील केला होता.

मावळते पोलिस आयुक्त पांडे यांना आपला आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे हटवावेत व त्यासाठी ३ मे हा अल्टीमेटम दिल्याच्या पार्श्वभूमीवर दिला होता. त्यामुळे मनसेच्या नेते, कार्यकर्त्यांची कोंडी झाली होती. आंदोलनासाठी परवानगी सक्तीची केली होती. तसेच मशिदींच्या शंभर मीटर आवारात भोंगे वाजविण्यास तसेच हनुमान चालीसा म्हणण्यास मनाई केल्याने एकप्रकारे मनसेच्या आंदोलनातील हवाच काढून घेतली होती. आता मात्र नवे पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी मात्र त्या आदेशाला बाजुला सारत भोंगे आंदोलनात नवा रंग भऱला आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.