अजितदादा शिंदे गटाचे उमेदवार झालेल्या संजय पवार यांचे काय करतील?

माघारीच्या वेळेत घडला खडसे निवासस्थान ते अजिंठा गेस्ट हाऊस ड्रामा.
Ajit Pawar & Sanjay Pawar
Ajit Pawar & Sanjay PawarSarkarnama

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार (Sanjay Pawar) यांनी धरणगाव तालुक्यातील उमेदवारीवर पॅनलमधून लढण्याबाबत चांगलाच ड्रामा झाला. यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचीही फोनद्वारे एन्ट्री झाली. मात्र, संजय पवार राष्ट्रवादीप्रणीत महाविकास पॅनलमध्ये (Mahavikas Aghadi) न राहता भाजपप्रणीत (BJP) शिंदे-भाजप पॅनलकडूनच लढण्यासाठी ठाम राहिले. (Sanjay pawar firmly stand with BJP even after Ajit pawar`s Phone)

Ajit Pawar & Sanjay Pawar
`राष्ट्रवादी`च्या राजेंद्र भोसले यांनी घडवला इतिहास!

धरणगाव तालुका मतदारसंघात संजय पवार यांच्याविरुद्ध वाल्मीक पाटील यांची उमेदवारी आहे. दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी कॉंगेसचे आहेत. मात्र, संजय पवार यांनी भाजप-शिंदे गटातून उमेदवारी जाहीर केली आहे. पॅनल होण्याअगोदरपासून संजय पवार भाजप-शिंदे गटाच्या पॅनलमध्ये आहेत. ते या पॅनलच्या प्रत्येक सभेला उपस्थित राहिले.

Ajit Pawar & Sanjay Pawar
जयकुमार रावल यांची १९ कोटींची मागणी पुर्ण होईल का?

सोमवारी माघारीच्या अंतिम दिवशी ते राष्ट्रवादी कॉंगेसचे असल्यामुळे महाविकास आघाडी पॅनलमध्ये येत असल्यास धरणगाव गटातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार वाल्मीक पाटील माघार घेतील व संजय पवार महाविकास आघाही पॅनलकडून बिनविरोध निवडून येतील, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची अपेक्षा होती.

त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांना पक्षाच्या नेत्यांनी फोन लावला. त्यानुसार अजित पवार संजय पवारांशी बोलण्यास तयार झाले. अजित पवारांनी थेट संजय पवार यांना फोन लावला. त्यानुसार दोघांमध्ये चर्चा झाली. अजित पवारांच्या आदेशानुसार चर्चा करण्यासाठी संजय पवार थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चर्चेला पोचले. त्यांच्या पॅनलमधील प्रवेशाबाबत पत्रकार परिषद घेण्याचे निश्‍चित झाले.

मात्र, बंद दाराआड चर्चा सुरू असताना, संजय पवार त्या ठिकाणाहून निघून आले. आपण शिंदे गट-भाजप पॅनलला शब्द दिला आहे. आपण शब्दाचे पक्के आहोत. आपल्या रक्तात आजही शरद पवार, अजित पवार आहेत. मात्र, सहकारात पक्ष नसतो. त्यामुळे आपण राष्ट्रवादीत आहोत. मात्र, निवडणूक शिंदे-भाजप पॅनलकडून लढणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आणि थेट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे अजिंठा विश्रामगृहात दाखल झाले.

दरम्यान, संजय पवार यांनीच आपल्याला बिनविरोध करावा, असा प्रस्ताव दिला होता. वाल्मीक पाटील यांनी अगोदर माघार घ्यावी. त्यांनतर आपण महाविकास आघाडीत असल्याची घोषणा करू. अगोदर तुम्ही महाविकास आघाडीत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर करा, त्यानंतर माघार घेऊ, असे सांगण्यात आले. मात्र ते काहीही न सांगता निघून गेले, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सांगण्यात आले.

आमदार पाटलांची खेळी

निवडणूक कार्यालयातही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या शिंदे-भाजप पॅनलमध्ये प्रवेशासाठी बिनविरोधची खेळी सुरू होती. पाचोरा मतदारसंघात शिंदे भाजप गटाचे किशोर पाटील विरुद्ध महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांचे अर्ज होते. माजी आमदार दिलीप वाघ यांनी शिंदे भाजप गटात येण्याची तयारी दाखविल्यास आमदार किशोर पाटील यांनी माघार घेण्याची तयारी दाखविली होती. दिलीप वाघ पाचोरा तालुक्यात एका नातेवाइकाच्या लग्नात होते. आमदार पाटील माघारीसाठी निवडणूक कार्यालयात हजर झाले होते. मात्र केवळ वाघ यांचा होकार आवश्‍यक होता. पाटील यांनी संपर्क सुरूच ठेवला. माघार घेण्याच्या अंतिम वेळीत बरोबर दुपारी तीनला पाच ते दहा मिनिटे शिल्लक असताना, दिलीप वाघ यांचा संपर्क झाला. त्यांनी तयारी दर्शविली अन्‌ किशोर पाटील यांची माघार घेतली व दिलीप वाघ बिनविरोध झाले. मात्र, ते शिंदे -भाजप पॅनलकडून झाले आहेत. असे त्यांनी तेथेच पत्रकारांना सांगितले. त्यानंतर दिलीप वाघ यांचीही व्हीडीओ क्लीप प्रसारित झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in