Nashik Bazar Samiti : बहुचर्चित नाशिक बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा : देविदास पिंगळे सभापती, तर उपसभापतीपदी खांडबहाले

विरोधी शिवसेनेच्या (शिंदे गट) शिवाजी चुंभळे गटाने निवडणुकीत भाग न घेतल्याने या निवडी बिनविरोध पार पडल्या.
Nashik Bazar Samiti Sabhapati Election
Nashik Bazar Samiti Sabhapati Election Sarkarnama

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देविदास पिंगळे यांची, तर उपसभापतीपदी उत्तम खांडबहाले यांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधी शिवसेनेच्या (शिंदे गट) शिवाजी चुंभळे गटाने निवडणुकीत भाग न घेतल्याने या निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत. मात्र, चुंभळे यांनी नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांचे अभिनंदन केले आहे. (NCP's Devidas Pingle as Chairman of Nashik Bazar Samiti)

नाशिक (Nashik) बाजार समितीची (Bazar Samiti) निवडणूक पहिल्यापासूनच चर्चेत आली होती. बाजार समितीच्या प्रचारात सहभागी होऊ नये म्हणून आपल्याला शिंदे गटाचे नेते शिवाजी चुंभळे आणि त्यांच्या मुलाकडून धमकी देण्यात आली आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना केला होता.

Nashik Bazar Samiti Sabhapati Election
Gajanan Kirtikar News : गजाभाऊ किर्तीकर आम्हाला सोडून जाणं, हे फार वेदनादायी होतं : शिवसेना खासदाराने बोलून दाखवली व्यथा

बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंगळे गटाने १२ जागा मिळविल्या होत्या. शिवाजी चुंभळे गटाला ६ जागांवर समाधान मानावे लागले हेाते. त्यानंतर नियमानुसार सभापती (Sabhapati) आणि उपसभापती निवडणूक होणे, अपेक्षित होते. पण, या निवडणुकीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. त्यानंतर नवनिर्वाचित संचालकांना अपात्र ठरवण्याची कार्यवाहीही मुख्यमंत्र्यांनी सुरू केली होती. पण, पिंगळे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्यानंतर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभातीची निवडणूक प्रक्रिया पार पडली.

Nashik Bazar Samiti Sabhapati Election
Maharashtra Politic's : पाठीत खंजीर खूपसणाऱ्या गद्दारांसाठी शिवसेनेचे दरवाजे परत उघडले जाणार नाहीत : शिवसेना नेत्याने ठणकावले

सभापती आणि उपसभापतीच्या पदाच्या आज झालेल्या निवडणुकीत दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा (रोहयो) उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी जाहीर केले. त्यानुसार खासदार देविदास पिंगळे यांची सभापतीपदी, तर उपसभापतीपदी उत्तम खांडबहाले हे विराजमान झाले.

Nashik Bazar Samiti Sabhapati Election
Shivsena News : शिवसेना शाखा प्रमुखाचा उल्हासनगरमध्ये चाकूने वार करून खून

दरम्यान, बाजार समितीच्या विकासासाठी प्रामाणिक काम करणार आहे. गेल्या ३० वर्षांत प्रामाणिक काम केल्यामुळे सभासदांनी आम्हाला पुन्हा संधी दिली आहे, असे नवनिर्वाचित सभापती देविदास पिंगळे यांनी सांगितले. आता भ्रष्टाचारमुक्त कारभार करा, असे सांगत शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काम करू, असे चुंभळे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com