Amalner Bazar Samiti Result : भाजपच्या तीन माजी आमदारांना धक्का देत राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांची आघाडी

Amalner Market Committee : आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीची बहुमताकडे वाटचाल
Amalner Market Committee
Amalner Market Committee Sarkarnama

Jalgaon News : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ प्रतोद आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. मात्र, भाजप-शिवसेना शिंदे गट पिछाडीवर आहे.

आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास पॅनलला पाच जागांवर विजय मिळाला असून बहुमताकडे वाटचाल आहे. तर भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ, माजी आमदार बी.एस.पाटील व शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या पॅनलला केवळ एक जागा मिळाली आहे. तर या निवडणुकीत एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे. उर्वरीत मतदार मतमोजणी अद्याप बाकी आहे.

Amalner Market Committee
Karad Bazar Samiti Result: कराडच्या प्रतिष्ठेच्या लढाईत कोण मारणार बाजी?

आमदार अनिल पाटील यांनी या बाजार समितीत पूर्ण ताकद पणाला लावली होती. भाजपच्या तीन माजी आमदारांनीही आपली ताकद लावली होती. सोबतील शिवसेना शिंदे गट होता. मात्र, तरी देखील आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीची बहुमताकडे वाटचाल ही भाजप, शिंदे गट युतीला धक्का मानला जात आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com