महाराष्ट्राच्या राज्यपालांना हटवा; ‘राष्ट्रवादी’च्या युवकांचे राष्ट्रपतींना पत्र

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्याविषयी संताप व्यक्त केला.
Governer Bhagatsingh Koshiyari
Governer Bhagatsingh KoshiyariSarkarnama

नाशिक : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshiyari) यांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने समस्त महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे (NCP) ‘राज्यपाल हटाव मोहीम उघडण्यात आली आहे. त्यानुसार पंचवटी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे राष्ट्रपतींना पत्र पाठविण्यात आले.

Governer Bhagatsingh Koshiyari
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मंत्रालयात जायलाही घाबरतो?

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व शहर उपाध्यक्ष किरण पानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी विभाग अध्यक्ष संतोष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पंचवटी पोस्ट कार्यालय येथे पंचवटी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे राष्ट्रपती महोदयांना ‘राज्यपाल हटाव’ मोहिमेचे पत्र पाठवण्यात आले.

Governer Bhagatsingh Koshiyari
`ईडी`ची कारवाई केल्याने भाजप विरोधात सत्य बोलणे थांबवणार नाही!

यासंदर्भात श्री. खैरे यांनी राज्यपालांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. राज्यपालांनी अतिशय सैल वक्तव्य केले आहे. त्यांनी तेथेच न थांबता, `रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारले असते` अशी दर्पोक्ती देखील केली. वस्तुतः त्यांनी जो विचार व्यक्त केला आहे, तो वस्तुस्थिती व संदर्भांना धरून नाही. अशा प्रकारचा प्रचार व चुकीची विशिष्ट विचारसरणीची मंडळी सतत पसरवत आली आहे. त्यात तत्थ्य नाही हे इतिहासातील संदर्भ व संशोधन सादर करून सप्रमाण हे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.

चुकीची माहिती व महापुरुषांचा गैरसमज होईल असा प्रयत्न राज्यपाल महोदयांनी केला आहे. त्यावर जनतेमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी करण्यात आली. या वेळी प्रणव पानकर, गणेश साळवे, अक्षय बर्वे, साहिल खैरे, गणेश गरगटे, राज लभडे, संकेत कुलकर्णी, बादल साळवे, रोहन शिंदे, अभिजित पाटील, दीपक कुलकर्णी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com