शिंदे, फडणवीसांनी निवडणुका गुजरात मधूनच लढवाव्यात!

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेखयांनी राज्य सरकारच्या कामकाजावर टिका केली.
Mehboob Shaikh
Mehboob ShaikhSarkarnama

नाशिक : महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रत्येक नागरिक राज्यातील सध्याच्या सरकारला (Shinde Government) कंटाळला आहे. त्यांनी अपेक्षा न केलेले हे सरकरा आहे. सध्या तर राज्यातील सरकार म्हणजे गुजरातची (Gujrat) चाकरी करणारे सरकार अशी त्याची प्रतिमा झाली आहे, अशी टिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP Youth Wing) प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख (Mehboob Shaikh) यांनी केली आहे. (NCP Youth Congress President said, CM Shinde & Devendra Fadanvis should contest elections from Gujrat)

Mehboob Shaikh
सावरकरांच्या जन्मभूमीत राष्ट्रवादीने अब्दुल सत्तार यांची खोक्यांसह तिरडी काढली!

शिर्डी येथील शिबिरानंतर त्यांनी नाशिकला भेट दिली. विविध पदाधिकारी, संस्थांना भेट देऊन चर्चा केली. यावेळी ते `सरकारनामा`शी बोलत होते.

Mehboob Shaikh
Bharat Jodo Yatra : तळपती मशाल हातात घेत राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल

ते म्हणाले, राज्यात दोन कोटी रोजगार दर वर्षाला देऊ असे सांगून सत्तेत आलेले मोदी सरकार होते. प्रत्यक्षात वेदांत फॉक्सकॉन, टाटा एअरबस सारखे मोठे प्रकल्प गुजरातला जता आहेत. या निर्णयांवर हे सरकार सध्या काम करत आहे. हीच त्यांची काम करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रातील तरुण उघड्या डोळ्यांनी हे सर्व बघत आहेत. सामान्य नागरिक त्यावर आता तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

राज्यातील यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने २००९ मध्ये बांधलेले नाशिकचे एअरपोर्ट व तिथे सुरू झालेली प्रवासी विमानसेवा ही देखील गुजरातला हलविण्याचा निर्णय नुकताच घेतला असल्याचे समजले. एकीकडे राज्यात ओला दुष्काळ असताना, महागाई वाढत असताना त्याविषयी कुठलीही संवेदनशीलता या सरकारमध्ये नसून महिनाभरामध्ये मोठमोठे निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या युवकाचा तोंडचा घास पळविण्याचे काम या खोके सरकारने केले आहे. शिंदे, फडणवीस व त्यांचे खोके सहकारी यांनी निवडणुका देखील गुजरात राज्यातूनच लढवाव्यात असे चित्र निर्माण झाले आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, अंबादास खैरे, नितीन भटारकर, तालुकाध्यक्ष गणेश गायधनी, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश धात्रक, शादाब सैय्यद उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com