कंगनाचा पद्मश्री परत घ्या! राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रपतींकडे मागणी

कंगना राणावतच्या वक्तव्यामुळे युवक राष्ट्रवादीचा पद्मश्री पुरस्काराला विरोध.
Kangana ranaut
Kangana ranautSarkarnama

नाशिक : अभिनेत्री कंगना राणावतने ‘१९४७ चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले.’ असे निंदनीय वक्तव्य करून संपूर्ण देशासह स्वातंत्र सैनिकांचा अपमान केल्याने त्यांना देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी राष्ट्रपती यांना केली आहे.

Kangana ranaut
पालकमंत्री भुजबळ- आमदार कांदे वादामुळे बैठक नाशिकला अन् निर्णय होणार मुंबईला!

यासंदर्भात राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. पत्रात म्हटले आहे की, कला क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे ८ नोव्हेंबर २०२१ रोजी कंगना राणावत यांना आपल्या हस्ते पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. कला क्षेत्र वगळता श्रीमती कंगना राणावत या प्रत्येक क्षेत्रात नको त्या ठिकाणी आपले नाक खुपसून प्रसिद्धी झोकात राहण्याचा प्रयत्न करत असतात. याच कारणाने प्रसिद्ध सोशल मिडिया अॅप टिव्हटरने श्रीमती कंगना राणावत यांचे अकाऊंट बंद केले होते.

पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर श्रीमती कंगना राणावत यांचे पाय जमिनीवर नसून सध्या त्या हवेत आहेत. त्यांनी प्रसार माध्यमांसमोर भारताचा अवमान केला आहे, त्या म्हणाल्या की ‘१९४७ चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्वातंत्र मिळविण्याकरिता महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस यासह आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांचा अपमान झाला असून या निंदनीय वक्तव्याने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे श्रीमती कंगना राणावत यांनी केलेल्या निंदनीय वक्तव्याचा आपण गांभीर्याने विचार करून त्यांना देण्यात आलेले पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा व त्यांच्यावर योग्य ती कारवाई.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com